29.2 C
Ratnagiri
Sunday, August 3, 2025

शैक्षणिकदृष्ट्या रत्नागिरी जिल्हा अग्रेसर बनत असल्याचा अभिमान वाटतोः ना. सामंत

शैक्षणिक क्षेत्रात विविधं प्रयोग होत आहेत. त्यामुळे...

खेडच्या जगबुडी पुलाजवळ भीषण अपघात; ११ वीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

कोकणात मुंबई गोवा महामार्गावर खेड जवळ पुलाजवळ...

व्हेल माशाच्या उलटीची तस्करी अडिच कोटींचा ऐवज केला जप्त

पोलिसांकडून डमी ग्राहकाने फोन केला... मोठं गिऱ्हाईक...
HomeEntertainmentगानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण, डॉक्टरनी सांगितले वृद्धापकाळामुळे सुधारणेस वेळ लागेल

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण, डॉक्टरनी सांगितले वृद्धापकाळामुळे सुधारणेस वेळ लागेल

डॉ. प्रतीत समदानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, लता मंगेशकर यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. त्याना अजूनही आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे.

राज्यात कोरोनाचा प्रभाव अचानक पुभा वाढला असून, सर्वसामान्य जनतेपासून ते सेलिब्रिटीजना देखील कोरोनाने विळखा घातला आहे. हिंदी, मराठी, तेलगु, कन्नड अनेक चित्रपट सृष्टीतील सिने अभिनेत्री, अभिनेता, सह कलाकार, गायक, कर्मचारी स्टाफ सर्वच संक्रमित होण्याचे प्रमाण वाढले आहे.

काही दिवसांपूर्वी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना सुद्धा कोरोनाची लागण झाल्याचे समजले. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लतादीदीची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली आहे. तसेच ब्रीच कँडीच्या मॅनेजमेंटला त्यांनी विनंती केली की,  लता मंगेशकर यांच्या प्रकृतीसंदर्भातील सर्व अपडेट माध्यमांना द्यावेत. जेणेकरून त्यांच्या चाहत्याना त्यांची खुशाली कळेल. तसेच मॅनेजमेंट आणि मंगेशकर परिवार एकत्रित चर्चा करून आरोग्य विषयक माहिती माध्यमांना देतील, असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांना उपचारासाठी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात लता मंगेशकर यांना दाखल करण्यात आलं आहे. लता मंगेशकर यांच्यावर उपचार करणारे डॉ. प्रतीत समदानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, लता मंगेशकर यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. त्याना अजूनही आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांच्या तब्ब्येतीत सुधारणा होत आहे, परंतु जसे वय वाढते तसे शरीर उपचारांना साथ कमी प्रमाणात देत. किंवा हळूहळू त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे असे आपण म्हणू शकतो.

लता मंगेशकरांवर उपचार करणारे डॉ. प्रतित समदानी म्हणाले, “गानसम्राज्ञी लता मंगेशकर अजूनही आयसीयूमध्येच असून आम्ही त्यांच्या प्रकृतीवर पूर्णपणे लक्ष ठेवून आहोत. वृद्धापकाळामुळे त्यांच्या तब्येतीत सुधारणा होण्यास वेळ लागेल” असे त्यांनी सांगितले. चाहते अनेक स्तरातून त्यांच्या तब्बेतीत लवकर सुधार व्हावा यासाठी प्रार्थना करत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular