29.1 C
Ratnagiri
Monday, February 3, 2025

राजापूर पालिकेच्या गोठ्याची दुरवस्था

तीव्र उतार आणि नागमोड्या वळणांच्या राजापूर शहरातील...

गावाचा सर्वांगीण विकास करणार – आ. शेखर निकम

गावाच्या विकासासाठी निधी, योजना आणि आवश्यक सुविधा...
HomeRatnagiriगणपतीपुळे येथील जीवरक्षकांच्या मानधनाचा विषयाला वेगळेच वळण

गणपतीपुळे येथील जीवरक्षकांच्या मानधनाचा विषयाला वेगळेच वळण

१६ जानेवारीपासून गणपतीपुळे ग्रामपंचायतीने आठ जीवरक्षकांना ब्रेक दिला आहे.

मागील काही दिवसांपासून गाजत असलेला गणपतीपुळे येथील जीवरक्षकांच्या मानधनाचा विषयाला आता वेगळेच वळण लागले आहे. गणपतीपुळे येथील समुद्रकिनाऱ्यावर स्थानिक ग्रामपंचायतीकडून १० जीवरक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. यातील आठ जीवरक्षकांना गणपतीपुळे ग्रामपंचायतीने गेल्या दोन दिवसांपूर्वी अचानकपणे ब्रेक दिल्याने या आठ जीवरक्षकांवर आता उपासमारीची वेळ येणार आहे.

रत्नागिरी सोडून इतर आजूबाजूच्या जिल्ह्यातून, मोठमोठ्या शहरांमधून मोठ्या संख्येने पर्यटक कोकणात येत असतात. बाहेरून आलेला पर्यटकांना समुद्राच्या पाण्याची मजा लुटायची असते त्यामुळे ते पुढचा मागचा, पाण्याच्या अंदाजाचा विचार न करता स्वताला पाण्यात झोकून देतात. आणि त्यामुळेच अनेक दुर्दैवी प्रसंग ओढवतात.

गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर होणाऱ्या संशयास्पद हालचाली व इतर बारीकसारीक गोष्टींवर लक्ष ठेवण्याचे काम या जीवरक्षकांकडून करण्यात येते. तसेच विशेषतः गणपतीपुळे समुद्रात बुडणाऱ्या पर्यटकांना वाचविण्याचे काम जीवरक्षकांकडून होत असतानाच १६ जानेवारीपासून गणपतीपुळे ग्रामपंचायतीने आठ जीवरक्षकांना ब्रेक दिला आहे. तर रोहित चव्हाण व अक्षय माने या फक्त दोन जीवरक्षकांना कार्यरत ठेवण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे.

याबाबतचे लेखी पत्र गणपतीपुळे ग्रामपंचायतीने जीवरक्षकांना दिले आहे. आता केवळ दोन जीवरक्षकांना गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावर काम करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र दोन्ही जीवरक्षक आपल्या इतर सहकार्‍यांना कमी केल्याने आपणही काम करणार नसल्याच्या ठाम भूमिकेत असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता एकूण दहा जीवरक्षकांनी समुद्रकिनाऱ्यावरील आपले काम थांबविल्याने गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येणार आहे.

ओमिक्रोन व्हायरसचा सध्या प्रादुर्भाव वाढत चालला आहे. हा व्हायरस वेगाने पसरत असल्यामुळे गणपतीपुळे येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या रोडावली आहे. त्यामुळे १६ जानेवारीपासून जीवरक्षकांना पुढील आदेश येईपर्यंत ब्रेक देण्यात येत असल्याचे स्पष्टीकरण गणपतीपुळे सरपंच यांनी जीवरक्षकांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. परंतु उर्वरित दोन जीवरक्षकानी संपूर्ण किनाऱ्यावरील जबाबदारी घेण्यास नकार दिला, त्यामुळे भविष्यात समुद्रकिनार्यावर कोणतीही दुर्घटना घडल्यास आम्ही जबाबदार राहणार नाही, असा इशारा १०  जीवरक्षकांनी एका निवेदनाद्वारे जयगड पोलिस ठाणे व गणपतीपुळे ग्रामपंचायतीला दिला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular