22.7 C
Ratnagiri
Tuesday, December 9, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeInternationalभारतात इलेक्ट्रिक वाहनांवर आयात शुल्कामध्ये कपात करण्याची मागणी - टेस्ला सीईओ एलन...

भारतात इलेक्ट्रिक वाहनांवर आयात शुल्कामध्ये कपात करण्याची मागणी – टेस्ला सीईओ एलन मस्क

टेस्लाने भारतातच ईव्हीचे मॅन्युफॅक्चरिंग करावे,  यानंतरच कर सवलतीबाबत विचार केला जाईल,  असे भारत सरकारने स्पष्ट केले आहे.

भारतामध्ये वायू प्रदूषणमुक्त देश करण्यासाठी केंद्रासह राज्यामध्ये सुद्धा इलेक्ट्रिक वाहनाचा वापर करण्यावर भर देण्यात यावा यासाठी प्रयत्न सुरु आहेत. परंतु, अशा अनेक अडचणी यामध्ये येत आहेत. त्याबद्दल टेस्लाचे सीइओ एलन मस्क यांनी त्यांच्या कंपनीला भारतामध्ये उद्भवणाऱ्या समस्यांबद्दल सांगितले आहे.

अमेरिकी कंपनी टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी सांगितले कि, भारतात वाहने लाँच करण्यासाठी आपल्याला सरकारी पातळीवर अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ते भारतात इलेक्ट्रिक कार लाँचिंगबाबत सोशल मीडियावर विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना परिस्थिती सांगितली आहे.

टेस्लाने मागील वर्षी भारतात इलेक्ट्रिक वाहनांवर आयात शुल्कामध्ये कपात करण्याची मागणी केली होती. त्याच्या उत्तरादाखल टेस्लाने भारतातच ईव्हीचे मॅन्युफॅक्चरिंग करावे,  यानंतरच कर सवलतीबाबत विचार केला जाईल,  असे भारत सरकारने स्पष्ट केले आहे.

प्रत्यक्षात मस्क यांना त्यांच्या कारवर आयात शुल्कात १००% सवलत हवी होती, परंतु, त्यांच्या उत्पादनाबाबत ते हमी देत नाहीत. तथापि, टेस्लाने भारतात वाहनांचे मॅन्युफॅक्चरिंग केले तरच कंपनीला योजनेचा फायदा मिळू शकेल. कंपनीच्या दबावात शासन अजिबात झुकणार नाही,  असे सरकारने स्पष्ट केलेले आहे. केंद्र सरकारने नुकतेच ऑटोमोबाइल क्षेत्रासाठी पीएलआय योजना लाँच केली आहे.

भारतात टेस्ला या वर्षापासून आयातीत इलेक्ट्रिक कार विकू पाहत आहे. टेस्लाच्या या मागणीला भारतातील अनेक स्थानिक ईव्ही कंपन्यानी विरोध दर्शविला होता. त्याचप्रमाणे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील टेस्लाला याबद्दल कल्पना दिली होती की,  कंपनीने भारतात इलेक्ट्रीक मेड इन इंडिया कार विक्रीवर लक्ष द्यावे. मात्र मस्क यांना स्थानिक बाजारात आयात कार कशी कामगिरी करतात, हे पाहायचे आहे.

RELATED ARTICLES

Most Popular