26.4 C
Ratnagiri
Sunday, August 3, 2025

मुहूर्ताच्या दिवशी पावसाचा खोडा केवळ २० टक्के नौका समुद्रात

शुक्रवारपासून मासेमारीवरील बंदी उठल्यानंतर पहिल्याच दिवशी स्थानिक...

“आम तो आम और गुटली का भी दाम” असा हा प्रकल्प : अनिकेत सुर्वे

"आता वाटद दशक्रोशीतील युवकांनी निर्धार केला आहे,...

स्मार्ट वीजमीटरचा निर्णय रद्द करायला लावू – लियाकत शाह

स्मार्ट वीजमीटर बसवल्यानंतर वाढीव वीजबिले येत असल्याच्या...
HomeRatnagiriमुंबई विद्यापीठ उपकेंद्र रत्नागिरीमधील एमएससीच्या १३ विद्यार्थ्यांची इंटर्नशिप पूर्ण

मुंबई विद्यापीठ उपकेंद्र रत्नागिरीमधील एमएससीच्या १३ विद्यार्थ्यांची इंटर्नशिप पूर्ण

चरित्रकार पद्मभूषण धनंजय कीर उपकेंद्र मुंबई विद्यापीठ रत्नागिरी यांच्या एमएससीच्या १३ विद्यार्थ्यांनी इंटर्नशिप पूर्ण केली आहे.

रत्नागिरीमध्ये शिक्षण आणि क्रीडा प्रकारामध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी प्रगती करत असलेले दिसून येत आहे. जिल्ह्यातून विविध ठिकाणाहून अनेक विद्यार्थी तालुक्यामध्ये शिक्षणासाठी येतात. अनेक जण उच्च शिक्षणासाठी विविध स्तरातून प्रयत्नशील असतात. आणि उत्तुंग यशानंतर अनेक उच्चस्तरीय पदावर कार्यरत असतात. मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र रत्नागिरी मध्ये आहे . त्याद्वारे अनेक विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी प्रविष्ठ होतात आणि यश संपादन करतात.

चरित्रकार पद्मभूषण धनंजय कीर उपकेंद्र मुंबई विद्यापीठ रत्नागिरी यांच्या एमएससीच्या १३ विद्यार्थ्यांनी इंटर्नशिप पूर्ण केली आहे. रत्नागिरी एमआयडीसीच्या दीपक गद्रे यांच्या गद्रे मरीन एक्पोर्ट प्रायव्हेट लिमीटेड आणि सुयोग एँक्वारियम रत्नागिरी येथे इनटर्नशीप पूर्ण केली आहे. एमएससी प्राणीशास्त्र विभागाच्या ९ आणि एमआयसी पर्यावरणशास्त्र विभागाच्या ४ मुलांनी ही इंटर्नशिप पूर्ण केली आहे. गद्रे कंपनीचे प्रमुख दीपक गद्रे तर सुयोग एँक्वारियमच्या सुयोग भागवत यांनी या विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केलं आहे.

गद्रे कंपनीमध्ये एमएससी प्राणीशास्त्रच्या गौरी केतकर, प्रणव सोनी, श्रेया राऊत, नेहा जोईल यांनी तर पर्यावरणशास्त्रच्या सनम दाते, ऋजुदा जाधव, गजानन खैरनार आणि वैष्णवी नार्वेकर यांनी इंटर्नशिप पूर्ण केली तर सुयोग एँक्वारियममध्ये प्राणीशास्त्र विभागाच्या , मयुरी घव्हाळी, सोनाली मोहिते, शितल फटकरे आणि श्रावणी राजपूत यांनी इंटर्नशीपपूर्ण केलंय. ३१ डिसेंबर २०२१  ते ७ जानेवारी २०२२  दरम्यान ही इंटर्नशीप या १३  विद्यार्थ्यांनी पूर्ण केली आहे. या विद्यार्थ्यांना रत्नागिरी उपकेंद्राचे प्रमुख डॉ. किशोर सुखटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्राणीशास्त्र विभागाच्या प्राध्यापक तैफीन तौसीफ पठाण व पर्यावरणशास्त्रचे प्राध्यापक निलेश रोकडे यांचे विशेष अमुल्य मार्गदर्शन लाभले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular