24.8 C
Ratnagiri
Monday, November 24, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeChiplunगोवळकोटमध्ये फुग्याच्या नायट्रोजन गॅस सिलिंडरच्या स्फोटात एक जखमी

गोवळकोटमध्ये फुग्याच्या नायट्रोजन गॅस सिलिंडरच्या स्फोटात एक जखमी

हा स्फोट एवढा मोठा होता की पत्र्याचे शेडही फाडून सिलिंडर इमारतीच्या तिसर्‍या मजल्यापर्यंत वर उडाला या स्फोटामुळे आजूबाजूला घबराट निर्माण झाली.

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हिंवाळयाच्या मोसमाला अनेक परप्रांतीय वस्तीने राहायला येतात. उपजीविकेसाठी ते रस्ताच्या कडेला किंवा बाजारपेठेमध्ये या सिझनला येणारे मसाल्याचे पदार्थ, विविध प्रकारच्या लाल मिरच्या,छत्री, स्वेटर, जर्किन, कानटोपी, लाकडी वस्तू, झोपले, लाकडी फर्निचर, आयुवेदिक औषधे, फुगे, खेळणी अशा अनेक प्रकरच्या वस्तू विकण्यासाठी म्हणून ते आपला प्रांत सोडून, दुसर्या शहरात सहकुटुंब वस्तीला जातात.

चिपळूण शहरातील गोवळकोट भागात सुद्धा अशी परप्रांतीय अनेक कुटुंबे वस्तीस आली आहेत. त्यातील एक जण फुगे भरण्याचा व्यवसाय करतो. आणि ते फुगे भरण्यासाठी वापरण्यात येणार्या नायट्रोजन गॅस सिलिंडरचा अचानक स्फोट झाल्याने झालेल्या अपघातात एक फुगे विकणारा जखमी झाला असून त्याला उपचारासाठी खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आला आहे.

गोवळकोट परिसरात काही परप्रांतीय राहतात मुलांच्या खेळण्यासाठी विविध रंगांचे फुगे फुगवून ते विक्री करण्याचा व्यवसाय करतात, हे फुगे फुगविण्यासाठी नायट्रोजन गॅस सिलिंडरचा वापर केला जातो. त्यापैकी एका गॅस सिलिंडरचा व्हॉल्व्ह तुटल्याने सिलिंडरचा मोठा स्फोट झाला. या स्फोटात फुगे विक्रेता जखमी झाला हा स्फोट एवढा मोठा होता की पत्र्याचे शेडही फाडून सिलिंडर इमारतीच्या तिसर्‍या मजल्यापर्यंत वर उडाला या स्फोटामुळे आजूबाजूला घबराट निर्माण झाली. या प्रकारा नंतर चिपळूण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.

नायट्रोजन वायू भरलेले फुगे उंचच्या उंच हवेमध्ये तसेच उभे राहता त्यामुळे लहानांसह मोठ्ठयाना देखील या फुग्यांचे आकर्षण कायमच असते. परंतु काही वेळा अशी फुग्याम्ध्ये वायू भरण्याची कामे कमी वयाच्या मुलांना देखील सांगितली जातात. आणि वायू लिक होऊन काही दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.

RELATED ARTICLES

Most Popular