27.9 C
Ratnagiri
Sunday, August 3, 2025

कुंभार्ली घाटाचे सोनपात्र घाट असे नामांतर करण्याची सकल धनगर समाजाची मागणी

सोनबा धनगर बांधवाची आठवण सदैव टिकवून ठेवण्यासाठी...

‘अनारक्षित मेमू रेल्वे’ बाबत नाराजी कोकण विकास समिती

गणेशोत्सवासाठी मध्यरेल्वेने जाहीर केलेल्या दिवा चिपळूण आणि...

दाभिळ, उन्हवरे, पानवळेत बीएसएनएलचे ‘नो नेटवर्क’

दापोली तालुक्यातील गावतळे बाजारपेठेसह उन्हवरे, दाभिळ, पावनळ...
HomeMaharashtraसुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीला राज्यशासनाची परवानगी

सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीला राज्यशासनाची परवानगी

फक्त सर्व प्रकारच्या वाईनच्या बाटल्यांवर सरकार प्रति बल्क लिटर नाममात्र उत्पादन शुल्क १० रुपये शुल्क एवढे आकारण्यात येणार आहे.

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सुपर मार्केट, वॉकिंग स्टोअरमध्ये वाईनच्या विक्रीला परवानगी देण्याबाबत प्रस्ताव आला होता. त्यामध्ये हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी यासंबंधीची माहिती दिली आहे. राज्यातील सुपरमार्केटमध्ये आता वाईन ची विक्री करता येणार आहे.

राज्यात नवी वाईन पॉलिसी राबवण्याचा राज्य सरकारचा विचार आहे आणि त्यादृष्टीनं राज्य सरकारनं आणखी एक पाऊल पुढं टाकलंय. एक हजार स्केअर फुटाच्या सुपर मार्केट असणाऱ्या एरियामध्ये वाईनची विक्री करता येऊ शकणार आहे. पुढच्या वर्षापर्यंत वाईन उद्योगाचा विस्तार १ हजार कोटी लिटरपर्यंत वाढवण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. त्यादृष्टीनं आता राज्य सरकारनं पाऊलं टाकायला सुरुवात केली आहे. सध्या राज्यात वाईनची दरवर्षी ७० लाख लिटर पर्यंत विक्री होते. सरकारच्या या नव्या धोरणामुळं हा आकडा १ हजार कोटी लिटरपर्यंत वाढत जाण्याची अपेक्षा आहे. मात्र, त्या आधी राज्य सरकारनं वाईनवर प्रति लिटर १० रुपयांचा अबकारी कर जाहीर केला आहे. त्यामुळे वाईनच्या किमतीमध्ये थोडी वाढ होणार आहे.

ज्या सुपर मार्केटचे क्षेत्रफळ १००० चौरस फुट पेक्षा अधिक असेल त्याठिकाणी एका स्टॉल मध्ये वाईन विक्री करण्याची मुभा असणार आहे. फक्त सर्व प्रकारच्या वाईनच्या बाटल्यांवर सरकार प्रति बल्क लिटर नाममात्र उत्पादन शुल्क १० रुपये शुल्क एवढे आकारण्यात येणार आहे. यातून राज्याला केवळ ५ कोटी रुपयांचा महसूल मिळणार आहे, परंतु उत्पादन शुल्क प्रशासनाला बाजारात विकल्या जाणार्‍या वाईनच्या बाटल्यांचे प्रमाण कळण्यास मदत होईल.

वाइन उद्योगाची भारतात सुमारे १ हजार कोटी रुपयांची उलाढाल आहे, त्यापैकी ६५% युनिट्स महाराष्ट्रात आहेत. नाशिकमध्ये सर्वाधिक वाईनरीज आहेत,  जे भारतातील सुमारे ८० 0% वाइन तयार करतात, त्यानंतर सांगली, पुणे, सोलापूर, बुलढाणा आणि अहमदनगर या शहरांचा क्रमांक लागतो.

RELATED ARTICLES

Most Popular