29.1 C
Ratnagiri
Sunday, August 3, 2025

कुंभार्ली घाटाचे सोनपात्र घाट असे नामांतर करण्याची सकल धनगर समाजाची मागणी

सोनबा धनगर बांधवाची आठवण सदैव टिकवून ठेवण्यासाठी...

‘अनारक्षित मेमू रेल्वे’ बाबत नाराजी कोकण विकास समिती

गणेशोत्सवासाठी मध्यरेल्वेने जाहीर केलेल्या दिवा चिपळूण आणि...

दाभिळ, उन्हवरे, पानवळेत बीएसएनएलचे ‘नो नेटवर्क’

दापोली तालुक्यातील गावतळे बाजारपेठेसह उन्हवरे, दाभिळ, पावनळ...
HomeRajapurमाझे कोण काय वाकडे करतो ! आरोपीची न्यायालयामध्ये हुल्लडबाजी

माझे कोण काय वाकडे करतो ! आरोपीची न्यायालयामध्ये हुल्लडबाजी

राजापूर पोलिसांनी या प्रकरणी दिलेल्या माहितीनुसार, पुंभवडे, वावूळवाडी येथील संजय बाणे याच्या विरोधात नाटे पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल आहे.

राजापूर तालुक्यातील नाटे पोलिसांनी एका संशयित आरोपीला न्यायालयात हजर करण्यासाठी आणले असता, त्याने न्यायालयीन परिसरामध्ये मोठ मोठ्याने आरडाओरड करत तेथील न्यायालयीन कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करत, तिथल्या साहित्याची तोडफोड केल्याचा प्रकार शनिवारी राजापूर दिवाणी न्यायालयात घडला आहे. या प्रकरणी संजय सखाराम बाणे वय ४५, रा. पुंभवडे, वावूळवाडी याच्या विरोधात राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजापूर पोलिसांनी या प्रकरणी दिलेल्या माहितीनुसार, पुंभवडे, वावूळवाडी येथील संजय बाणे याच्या विरोधात नाटे पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल आहे. शनिवार दि. २९  रोजी सकाळी पावणे अकराच्या सुमारास त्याला नाटे पोलिसांनी राजापूर दिवाणी न्यायालयात हजर करण्यासाठी आणले असता त्याने न्यायदान कक्षामध्येच मोठ्या आवाजात ओरडत ‘माझे कोण काय वाकडे करतो’ अशा धमक्या देण्यास सुरूवात केली. तसेच न्यायालयामधील चौकशी कक्षाच्या काचेवर हात मारून, तेथील काच फोडण्याचा देखील प्रयत्न केला. त्यावेळी न्यायालयातील कर्मचारी त्याला समजवण्यासाठी गेले असता त्याने न्यायालयातील कर्मचाऱ्यांना ढकलून देऊन न्यायाधीश कक्षाच्या बाहेर धावत गेला. त्यावेळी त्याला पकडून आणत सरकारी वकील कक्षात बसविले असता, त्याने संगणकाची वायर हाताने ओढून संगणक उपकरणाची नासधूस केली आहे.

या प्रकरणी राजापूर दिवाणी न्यायालयातील रविकांत शांताराम कदम यांनी राजापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण केल्या प्रकरणी संजय बाणे याच्या विरोधात पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक एम.एल.मौळे करीत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular