26.5 C
Ratnagiri
Saturday, July 5, 2025

विजयदुर्ग’ वर पूल बांधून दोन जिल्हे जोडा…

तालुक्यातील कुंभवडे व सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी...

दाभोळ बंदराचा विकास करा – आ. शेखर निकम

दाभोळ ते पेढे हा जलमार्ग क्र. २८...

मोकाट गुरांचा दिवसाचा खर्च १० हजार – पालिकेला भुर्दंड

शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिकेने हाती...
HomeTechnologyयूट्यूबवर १ कोटी सबस्क्रायबर मिळवणारे जगातील पहिले नेते पीएम नरेंद्र मोदी

यूट्यूबवर १ कोटी सबस्क्रायबर मिळवणारे जगातील पहिले नेते पीएम नरेंद्र मोदी

एवढे सबस्क्रायबर मिळवणारे मोदी हे जगातील पहिले नेते ठरले आहेत

सोशल मिडीयावर अनेक जण कायमच चर्चेत राहण्यासाठी प्रयत्न करत असतात. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे यूट्यूबवर १ कोटी सबस्क्रायबर झाले आहेत. एवढे सबस्क्रायबर मिळवणारे मोदी हे जगातील पहिले नेते ठरले आहेत. २६ ऑक्टोबर २००७ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यूट्यूब जॉइन केले. जगभरातील नेत्यांमध्ये मोदींनंतर ब्राझीलचे प्रेसिडेंट जायर बोल्सोनारो यांचा नंबर लागत असून त्यांचे एकूण ३६ लाख सबस्क्रायबर आहेत.

पीएम मोदी जरी २००७ मध्ये यूट्यूबवर जॉईन झाले असले तरी, त्यांनी ४ वर्षांनंतर २०११ सालामध्ये आपला पहिला व्हिडिओ अपलोड केला होता. हा व्हिडिओ गुजरातच्या २०११-१२ च्या अर्थसंकल्पासंदर्भात  आहे. या व्हिडिओला एकूण ३५,३७५ व्ह्यूज मिळाले होते. त्याला १४०० लाईक्स मिळाले आहेत. तेव्हापासून त्यांच्या चॅनलवर व्हिडिओ येतच राहिले,  जे लाखो लोक पाहात आहेत.

मोदींचे यूट्यूब चॅनल Narendra Modi नावाने आहे. या चॅनलवरून ते पीएमओ इंडिया, भारतीय जनता पार्टी, योग विथ मोदी आणि एक्झाम वॉरियर्स मंत्रज या यूट्यूब चॅनेलचाही प्रचार करतात. ते त्यांच्या चॅनलवर सरकारशी संबंधित योजना, थेट कार्यक्रमही दाखवतात.

मोदींच्या चॅनलचा सर्वाधिक लोकप्रिय व्हिडिओ एका दिव्यांगाचा आहे. १४ सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये मोदी एका तरुणाला भेटत आहेत. तरुण मोदींशी बोलतो आणि नंतर त्यांच्या पायाला स्पर्श करून आशीर्वाद घेतो. हा व्हिडिओ काशीमधील असून, जो १९ फेब्रुवारी २०१९ रोजी अपलोड करण्यात आला  होता. त्याला एकूण ७ कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्याला ११ लाख लाईक्स देखील ळाले आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular