26.5 C
Ratnagiri
Saturday, July 5, 2025

विजयदुर्ग’ वर पूल बांधून दोन जिल्हे जोडा…

तालुक्यातील कुंभवडे व सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी...

दाभोळ बंदराचा विकास करा – आ. शेखर निकम

दाभोळ ते पेढे हा जलमार्ग क्र. २८...

मोकाट गुरांचा दिवसाचा खर्च १० हजार – पालिकेला भुर्दंड

शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिकेने हाती...
HomeKokanरोहा ते वेर्णा या मार्गावरील विद्युतीकरणाचे ८७ टक्के काम पूर्ण

रोहा ते वेर्णा या मार्गावरील विद्युतीकरणाचे ८७ टक्के काम पूर्ण

फेब्रुवारीत हे काम पूर्ण होण्याचा आशावाद कोकण रेल्वे प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे. 

कोकण रेल्वे पर्यटन वाढण्यासाठी तसेच प्रदुषणाचे होणारे नुकसान रोखण्यासाठी विजेवर चालवण्याकडे भार दिला जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्याची ट्रायल सुद्धा काही दिवसांपूर्वी घेण्यात आली. त्यासाठी काही विशेष मार्गांवर त्यासाठी आवश्यक असणाऱ्या विद्युतीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली असून, रोहा ते वेर्णा मार्गावरील काम वेगाने पूर्णत्वास जाण्याच्या स्थितीमध्ये आहे.

आता कोकण रेल्वे विजेवर धावणार आहे. पर्यावरणपूरक इंधनावर धावणारे इंजिन कोकण रेल्वेला जोडण्याचा निर्णय झाल्यानंतर आता कोकणच्या कडाकपार्‍यातून जाणारी कोकण रेल्व विजेवर धावू लागणार आहे. रोहा ते वेर्णा या मार्गावरील विद्युतीकरणाचे ८७ टक्के काम पूर्ण झाले असून, त्यासाठी सुमारे १ हजार १०० कोटींचा निधी खर्च करण्यात आला आहे.

भारतीय रेल्वे मार्गावरील अनेक ठिकाणी विद्युतीकरणाचे काम सुरू आहे. भारतातील सर्वात मोठे रेल्वेचे विद्युतीकरणाचे काम कोकण रेल्वे मार्गावर सुरू आहे. मागील वर्षी रोहा ते रत्नागिरी स्थानकापर्यंत विद्युतीकरण पूर्ण झाले तर कारवार ते ठोकूर येथील विद्युतीकरणाची कामे सुरू आहेत. उर्वरित रत्नागिरी ते कारवार या विभागातील काम अंतिम टप्प्यात आले असून, बोगद्यामधील विद्युत यंत्रणा, केबल टाकणे व उर्वरित कामे वेगवान गतीने सुरू आहेत. सध्या एकूण ८७ टक्के काम झाले असून फेब्रुवारीत हे काम पूर्ण होण्याचा आशावाद कोकण रेल्वे प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

त्यामुळे रेल्वे मुळे उद्धभवणारी वायू प्रदूषणाची समस्या आता संपुष्टातच येणार आहे. विजेवर धावणारी रेल्वे इंजिन बनविणे हे रेल्वे प्रशासनासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे.

RELATED ARTICLES

Most Popular