27.7 C
Ratnagiri
Saturday, July 5, 2025

विजयदुर्ग’ वर पूल बांधून दोन जिल्हे जोडा…

तालुक्यातील कुंभवडे व सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी...

दाभोळ बंदराचा विकास करा – आ. शेखर निकम

दाभोळ ते पेढे हा जलमार्ग क्र. २८...

मोकाट गुरांचा दिवसाचा खर्च १० हजार – पालिकेला भुर्दंड

शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिकेने हाती...
HomeMaharashtraऔरंगाबादच्या ट्रेकरचा ढाक बहिरीच्या सुळक्यावरून पडून मृत्यू

औरंगाबादच्या ट्रेकरचा ढाक बहिरीच्या सुळक्यावरून पडून मृत्यू

ढाक बहिरीच्या सुळक्यावर गेल्यानंतर प्रतीक याचा तोल गेल्याने तो खाली पडला आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू ओढवला आहे.

हल्ली अनेक जण विकेंड अथवा आवड म्हणून भटकंती करायला बाहेर पडतात. कित्येक जणांना गड किल्ले यावर ट्रेकिंगची आवड असते. काही जण त्याचे पूर्ण ट्रेनिंग घेतात तर काही असेच मित्रांच्या सहाय्याने ग्रुपने फिरायला म्हणून बाहेर पडतात. पण काही वेळेला न घेतलेल्या काळजीमुळे असे ट्रेकिंग जीवावर बेतण्याच्या घटना देखील घडतात. त्यामुळे स्वतःची शारीरिक क्षमता तपासून, योग्य ते ट्रेनिंग घेणे गरजेचे असल्याचे वारंवार सांगण्यात येते.

पूणे जिल्ह्यातील राजमाची किल्ल्याजवळ असलेल्या ढाक बहिरीच्या सुळक्यावरून वरून पडल्याने एका ट्रेकरचा मृत्यू झाला. शनिवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. प्रतिक आवळे रा. औरंगाबाद असे मृत्युमुखी पडलेल्या ट्रेकरचे नाव आहे. लोणावळा जवळ कर्जत आणि मावळ तालुक्याच्या मध्यावर ढाक-बहिरी हा एक उंचच्या उंच सुळका आहे. या किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी प्रतीक आणि त्याचे साथीदार औरंगाबादहून प्रवास करून आले होते. ढाक बहिरीच्या सुळक्यावर गेल्यानंतर प्रतीक याचा तोल गेल्याने तो खाली पडला आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू ओढवला आहे.

सुळक्यावरून कोणीतरी तोल जाऊन खाली कोसळल्याची माहिती समजताच स्थानिक गावकरी आणि यशवंती हायकर्स खोपोलीची टीम ढाक-बहिरी सुळक्याच्या इथे पोहोचली. त्यानंतर अथक प्रयत्नानंतर किरर्र काळोख आणि उंच सखल पाय वाट तसेच डोंगर उतार व कड्याच्या बाजूचा अरुंद जागेतून पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास प्रतीकचा मृतदेह एवढ्या खोलीतून बाहेर काढण्यात यश आले. या घटनेबाबतचा अधिक तपास स्थानिक पोलीस करीत आहेत.

एवढ्या लांबून औरंगाबादहून या उंच सुळक्याची चढण करण्यासाठी आलेल्या प्रतिकचे साथीदार या हृदयद्रावक घटनेने अक्षरशा हादरून गेले आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular