27.1 C
Ratnagiri
Saturday, July 5, 2025

मेरा ई-केवायसी अॅप टाळेल रेशनकार्ड रद्दची कारवाई

ई-केवायसी अपूर्ण असलेल्या जिल्ह्यातील ३ लाख ३...

तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी रत्नागिरीत बँक अधिकाऱ्यावर गुन्हा

'माझी मुलगी सुखप्रीत हिच्याशी जसमिक सिंग याने...
HomeRatnagiriमुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या अपघातात आई मृत, मुलगा गंभीर जखमी

मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या अपघातात आई मृत, मुलगा गंभीर जखमी

सकाळी सुहास हा आपल्या दुचाकी क्र.एम.एच.०८, ए. व्ही. ८६९७ वरून त्याची आई सौ. सविता हिला घेवून नेरकेवाडी कडून राजापूरकडे येत होता

महामार्गावर बेदरकारपणे वाहन चालवल्यामुळे अनेक प्रकारचे अपघात घडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. एखाद्याच्या बेफिकीरपणे वाहन चालवण्याची शिक्षा दुसऱ्याच्या अपघातास तर काही वेळा मृत्यूसही जबाबदार ठरू शकते. त्यामुळे पोलीस अशा बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्यांवर लक्ष ठेवून असतात आणि योग्यवेळी योग्य ती कारवाई करताना दिसतात.

मुंबई-गोवा महामार्गावर काल नेरकेवाडी येथे कोळेकर फार्म हाऊस समोर मारूती कारने दुचाकी स्वाराला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघात दुचाकीच्या पाठीमागे बसलेल्या एका ५२ वर्षीय महिलेचा मृत्यू ओढवला आहे. तर दुचाकी चालक सुद्धा त्यामध्ये गंभीर जखमी झाला आहे. सकाळी ९.३० वाजण्याच्या दरम्यान हा अपघात घडला आहे.

सकाळी सुहास हा आपल्या दुचाकी क्र.एम.एच.०८, ए. व्ही. ८६९७ वरून त्याची आई सौ. सविता हिला घेवून नेरकेवाडी कडून राजापूरकडे येत होता. तो नेरकेवाडी येथील कोळेकर फार्म जवळ आला असता, याच दरम्यान मुंबई कडून गोव्याच्या दिशेने भरधाव वेगामध्ये बेदरकारपणे येणाऱ्या मारूती सुझीकी अल्टो कार क्र. एम. ०६, ए. एस. ७६२९ च्या चालकाने यांच्या दुचाकीला एवढी जोरदार पाठीमागून धडक दिली कि, त्यामध्ये सुहास ची आई गंभीर जखमी झाल्या, पण हि धडक एवढी जबरदस्त होती कि, सौ.सविता सखाराम पुजारी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मृत महिलेचे नाव सौ.सविता सखाराम पुजारी असून त्यांचा या अपघातात मृत्यू ओढवला आहे. आणि चालक असलेला त्यांचा मुलगा सुहास सखाराम पुजारी हा देखील गंभीररित्या जखमी झाला आहे. अल्टो चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, या प्रकरणातील पुढील तपास संबधित पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular