29.1 C
Ratnagiri
Tuesday, August 5, 2025

अकरावी प्रवेशाचा ऑनलाईन गोंधळ सुरूच विद्यार्थ्यांसह पालक धास्तावले

ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील गोंधळामुळे अकरावीमध्ये प्रवेश घेणाऱ्या...

कोकणनगरमध्ये ३१ हजारांचा गांजा जप्त…

शहरातील कोकणनगर ते प्रशांतनगर येथे पोलिस गस्त...

वाशिष्ठीत पतीचा मृतदेह सापडला, आत्महत्येचे कारण अस्पष्ट

वाशिष्ठी नदीत उडी घेतलेल्या दांपत्यामधील नीलेश अहिरे...
HomeSindhudurgनितेश राणेंना अधिक उपचारासाठी सीपीआर कोल्हापूरला हलवले

नितेश राणेंना अधिक उपचारासाठी सीपीआर कोल्हापूरला हलवले

आमदार नितेश राणे यांची तब्येत जास्तच खालावल्याने, त्यांना अधिक वैद्यकीय तपासणीसाठी कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात दाखल केले आहे.

आमदार नितेश राणे यांना कणकवली दिवाणी न्यायालयाने शुक्रवारी १८ फेब्रुवारी पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्यांचा अचानक रक्तदाब वाढून तब्येत बिघडली म्हणून त्यांना लगेचच जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान तातडीने नितेश राणे यांच्या वकिलांनी जिल्हा सत्र न्यायालयामध्ये आमदार नितेश राणे आणि त्यांचे खासगी सचिव राकेश परब यांचा जामीन अर्ज दाखल केला आहे. या जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी होणार होती.

न्यायालयाने जामीन अर्ज नाकारल्यास जास्तच गोंधळ उडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आमदार नितेश राणे यांची तब्येत जास्तच खालावल्याने, त्यांना अधिक वैद्यकीय तपासणीसाठी कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्या छातीत दुखू लागल्यामुळे, आणि ओरोस जिल्हा रुग्णालयात कार्डियाक यंत्रणा आणि ह्रदयरोग तज्ज्ञ उपलब्ध नसल्याने, नितेश राणे यांना कोल्हापूरला नेण्यात येत असल्याचे समजते.

कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात त्यांना जिल्ह्यातील डॉक्टरांच्या विशेष पथकाच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. पोलीस बंदोबस्तात १०८ रुग्णवाहिकेतून नितेश यांना घेऊन वैद्यकीय पथक कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाले आहे. छातीमध्ये जास्तच दुखू लागल्याने, रुग्णवाहिका आणि पोलिसांचा ताफा मधेच थांबवून त्यांना डॉक्टरांनी त्यांना तपासून औषध देखील दिले. त्या पार्श्वभूमीवर त्यांचे कोल्हापुरातील कार्यकर्ते सकाळी सीपीआर रुग्णालयात कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी धावपळ करताना दिसत आहेत.

नितेश राणे यांना पोलीस कोठडीत रहायला लागू नये यासाठी त्यांच्या छातीत दुखू लागले, रक्तदाब वाढला अशा प्रकारच्या अनेक गोष्टी व्हायरल होत आहेत. इतर राजकीय पक्ष या आजारपणाला जेलमध्ये न राहण्यासाठीची पळवाट देखील म्हणत आहेत. अनेक प्रकारचे मीम्स यावर प्रसिद्ध होत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular