25.8 C
Ratnagiri
Saturday, March 15, 2025

चिपळूण – कऱ्हाड रेल्वेमार्गाचे स्वप्न अधांतरीच, खासदार तटकरे यांचे आश्वासनही हवेत

राज्याच्या अर्थसंकल्पात चिपळूण-कऱ्हाड रेल्वेमार्गासाठी आर्थिक तरतूद करण्यात...

राजापूर तालुक्यात डॉक्टर नियुक्तीमधील धरसोडीमुळे संताप

प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एमबीबीएस डॉक्टर नसताना कंत्राटी...
HomeIndiaहिजाब प्रकरण, कर्नाटकातील शाळा महाविद्यालय पुढील तीन दिवस बंद- मुख्यमंत्री बोम्मई

हिजाब प्रकरण, कर्नाटकातील शाळा महाविद्यालय पुढील तीन दिवस बंद- मुख्यमंत्री बोम्मई

कर्नाटकात हा वाद वाढत गेला आणि अनेक शाळेत हिजाब विरोधात भगवा शेला असे चित्र पहायला मिळत आहे.

गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकामध्ये शाळेत बुरखा घालून येणाऱ्या मुलींना शाळेत प्रवेश न देण्यावरून या वादाला सुरवात झाली आहे. ड्रेसकोडचं कारण पुढे करत शहरातील प्री-युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये सहा विद्यार्थिनींना हिजाब परिधान केल्यामुळे प्रवेश नाकारण्यात आला. त्या विद्यार्थिनीनी देखील हिजाब काढण्यास नकार दर्शविल्याने सर्व गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. त्यानंतर कर्नाटकात हा वाद वाढत गेला आणि अनेक शाळेत हिजाब विरोधात भगवा शेला असे चित्र पहायला मिळत आहे. आता हे प्रकरण न्यायालयापर्यंत गेले असल्याने, पुढे याला वेगळे वळण लागू नये म्हणून  पुढील तीन दिवस कर्नाटकातील शाळा महाविद्यालय बंद ठेवण्यात येणार आहेत.

मागील काही दिवस मुस्लिम विद्यार्थिनींना शाळेमध्ये आणि महाविद्यालयामध्ये हिजाब घालण्यावर बंदी घालण्यात आली होती. त्याविरोधात न्यायालयात विद्यार्थिनींनी दाद मागितली आहे. परंतु काही ठिकाणी त्यांना विरोध करण्यासाठी हिंदू विद्यार्थी शाळा आणि महाविद्यालायच्या आवारात भगवा शेला घालून पहायला मिळत असून येथील वातावरण आता चांगलेच चिघळत असल्याचे बघायला मिळत आहे. असे असतांनाच आता वाढत्या वादामुळे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई मोठा निर्णय घेतला असून राज्यातील पुढील तीन दिवसांसाठी सर्व शाळा आणि कॉलेज बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

सर्व शाळा आणि कॉलेज प्रशासनासोबत विद्यार्थी, शिक्षक आणि कर्नाटकांच्या लोकांना शांती आणि सलोखा राखण्याचे आवाहन मी करतो. मी पुढील तीन दिवसांसाठी शाळा आणि कॉलेज बंद करण्याचे आदेश दिले आहेत. सर्व संबंधितांना सहकार्याची विनंती आहे’, असे यावेळी ते म्हणाले आहेत.

औरंगाबाद शहरातील देखील काही तरुणींनी यावर आपली प्रतिक्रिया नोंदविल्या असून,  हा आमचा अधिकार असून,  आपल्या धर्मानुसार जगण्याचा आणि राहण्याच्या आम्हाला संविधानाने अधिकार दिला आहे. त्यामुळे अशा पद्धतीने हा वाद निर्माण करणे हा राजकारणाचा एक भाग असल्याचं त्या तरुणीनी म्हटलं आहे. त्याचप्रमाणे कलम २५ नुसार कोणते ड्रेस घालावे याचं आम्हाला संविधानाने स्वातंत्र्य दिले आहे, असेही त्या म्हणाल्या.

RELATED ARTICLES

Most Popular