26.7 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

मुहूर्ताच्या दिवशी पावसाचा खोडा केवळ २० टक्के नौका समुद्रात

शुक्रवारपासून मासेमारीवरील बंदी उठल्यानंतर पहिल्याच दिवशी स्थानिक...

“आम तो आम और गुटली का भी दाम” असा हा प्रकल्प : अनिकेत सुर्वे

"आता वाटद दशक्रोशीतील युवकांनी निर्धार केला आहे,...

स्मार्ट वीजमीटरचा निर्णय रद्द करायला लावू – लियाकत शाह

स्मार्ट वीजमीटर बसवल्यानंतर वाढीव वीजबिले येत असल्याच्या...
HomeMaharashtraबच्चू कडूंकडून निवडणूक आयोगाची दिशाभूल, दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा

बच्चू कडूंकडून निवडणूक आयोगाची दिशाभूल, दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा

२०१७ सालामध्ये भाजपचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी बच्चू कडू यांच्या विरोधात याप्रकरणी तक्रार दाखल केली होती.

निवडणूक आयोगाची, राज्याचे महिला बालकल्याण व शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केलेल्या दिशाभूल प्रकरणी यांना न्यायालयाने दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. चांदूरबाजार प्रथम वर्ग न्यायालयाने हा निर्णय जाहीर केला आहे. बच्चू कडू यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मुंबई येथील एका मालमत्तेची माहिती आयोगाला दिली नसल्याने एक प्रकारची दिशाभूल बच्चू कडूंनी केल्याप्रकरणी ५ वर्षांनी त्याची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

२०१७ सालामध्ये भाजपचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी बच्चू कडू यांच्या विरोधात याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. बच्चू कडू यांनी मुंबईत ४२ लाख ४६ हजार रुपयांचा मालकीचा फ्लॅट असतानाही २०१४ ची विधानसभा निवडणुकीवेळी या फ्लॅटबद्दलची माहिती निवडणूक आयोगापासून लपवून ठेवल्याचा आरोप बच्चू कडूंवर होता. याच आरोपांवरुन २०१७  मध्ये कडूंविरुद्ध लोकप्रतिनिधी कायद्यान्वे गुन्हा दाखल झाला होता.

याप्रकरणी बच्चू कडूंनी २०१७ मध्ये स्पष्टीकरण दिले होते कि, सर्व आमदारांना राजयोग सोसायटीने घर उपलब्ध करुन दिले होते. आणि त्यासाठी लागणारे बँकेचे ४० लाख रुपये कर्जसुद्धा उपलब्ध करुन देण्यात आले होते. पण कर्जाची वेळेमध्ये परतफेड न होऊ शकल्याने चार महिन्यांच्या कालावधी आधीच ते विकण्यात आल्याचा दावा बच्चू कडूंनी केला होता. त्यामुळे आपल्यावरील सर्व आरोप खोटे होते. असे त्यांचे म्हणणे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  बच्चू कडू यांनी मुंबईत म्हाडाच्या यत्रणेकडून २०११  मध्ये ४२ लाख ४६ हजार रुपयांत फ्लॅट विकत घेतला होता. बच्चू कडूंनी १९ एप्रिल २०११  रोजी त्या फ्लॅटचा ताबा घेतला होता. त्यानंतरच बच्चू कडूंनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला होता. त्यामध्ये त्यांनी मुंबईतील या मालमत्तेविषयी माहिती निवडणूक आयोगापासून लपवून ठेवली. त्याच गोष्टीला पकडून तक्रारदारांनी बच्चू कडूंनी आयोगाची दिशाभूल झाल्याचा ठपका ठेवत तक्रार दाखल केलेली. या प्रकरणी गेल्या पाच वर्षांपासून न्यायालयीन प्रक्रिया सुरु होती. अखेर कोर्टाने बच्चू कडू यांना दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular