27.9 C
Ratnagiri
Sunday, August 3, 2025

कुंभार्ली घाटाचे सोनपात्र घाट असे नामांतर करण्याची सकल धनगर समाजाची मागणी

सोनबा धनगर बांधवाची आठवण सदैव टिकवून ठेवण्यासाठी...

‘अनारक्षित मेमू रेल्वे’ बाबत नाराजी कोकण विकास समिती

गणेशोत्सवासाठी मध्यरेल्वेने जाहीर केलेल्या दिवा चिपळूण आणि...

दाभिळ, उन्हवरे, पानवळेत बीएसएनएलचे ‘नो नेटवर्क’

दापोली तालुक्यातील गावतळे बाजारपेठेसह उन्हवरे, दाभिळ, पावनळ...
HomeMaharashtraअखेर भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाची स्थापनेची घोषणा - ...

अखेर भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाची स्थापनेची घोषणा – नाम. सामंत

आज लता मंगेशकर यांच्या निधनानंतर भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाची स्थापन करणार असल्याचे सामंत यांनी सांगितले आहे.

मागील काही दिवसांपूर्वी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मुंबईत ‘मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय’ सुरू करण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली होती. दरम्यान, यावर आता सामंत यांनी पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिली आहे.

आता लवकरच लतादीदींचे स्वप्न पूर्ण होणार असून मुंबईतील कलिना कॅम्पस समोर भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाची स्थापन करणार असल्याची माहिती राज्याचे शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. तसेच लता मंगेशकर यांच्या नावाने एक भव्य संग्रहालय उभारणार असल्याचंही सामंत यांनी माहिती दिली आहे.

मंत्रीमंडळ बैठकीत हा निर्णय झाला असून मुंबईतील कलिना कॅम्पस समोरील उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या ३  एकर जागेवर हे महाविद्यालय उभारणार असल्याची माहिती सामंत यांनी दिली. दरम्यान, आंतराष्ट्रीय संगीत महाविद्यालय स्थापन करण्याचे दिदींचे स्वप्न होते. लता मंगेशकर हयात असताना दीनानाथ मंगेशकर संगीत महाविद्यालय असावं असं लतादीदींचं स्वप्न होतं.

विद्यापीठाने यासाठी जागा नाकारली असल्यानं कलिना येथील विभागाची जागा द्यायचा निर्णय घेतला असल्याचं काही दिवसांपूर्वी ट्वीट करुन त्यांनी ही माहिती दिली होती. यासाठी जी समिती स्थापन करण्यात आली होती. त्याच समितीने आता या महाविद्यालयाचे नाव लता दीनानाथ मंगेशकर ठेवण्याचा प्रस्ताव दिला. त्यानंतर आज लता मंगेशकर यांच्या निधनानंतर भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाची स्थापन करणार असल्याचे सामंत यांनी सांगितले आहे. मंगेशकर कुटुंबियांच्या सूचनेनुसार भारतरत्न लता-दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती नाम. सामंतांनी दिली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular