30.2 C
Ratnagiri
Saturday, March 15, 2025

चिपळूण – कऱ्हाड रेल्वेमार्गाचे स्वप्न अधांतरीच, खासदार तटकरे यांचे आश्वासनही हवेत

राज्याच्या अर्थसंकल्पात चिपळूण-कऱ्हाड रेल्वेमार्गासाठी आर्थिक तरतूद करण्यात...

राजापूर तालुक्यात डॉक्टर नियुक्तीमधील धरसोडीमुळे संताप

प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एमबीबीएस डॉक्टर नसताना कंत्राटी...
HomeMaharashtraकुणी भूंकत असेल, तर भुंकू द्या त्यांना सवय असते – संजय राऊत

कुणी भूंकत असेल, तर भुंकू द्या त्यांना सवय असते – संजय राऊत

आता ते शिवसेना नेते संजय राऊत आणि त्यांच्या निकटवर्तीयांनी पुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये भ्रष्ट्राचार केल्याचा आरोप करत आहेत

राज्यात सुरु असलेले अनेक घोटाळे, गैरव्यवहार, अपहार, खटले यावरून अनेक पक्षांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या सातत्याने कोणत्या कोणत्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या काहीतरी चुकीच्या गोष्टीचा शोध घेत आहेत. आणि त्यावरून त्यांचे खरे खोटे आरोप करणे सुरुच  आहेत.

आता ते शिवसेना नेते संजय राऊत आणि त्यांच्या निकटवर्तीयांनी पुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये भ्रष्ट्राचार केल्याचा आरोप करत आहेत. याच आरोपांवर आता शिवसेना खासदार संजय राऊत आक्रमक झाले असून, मी घाबरत नाही, जे काम केले आहे ते निव्वळ  देशानेच नाही तर, संपूर्ण जगाने पाहिले आहे,  अशा शब्दात संजय राऊत यांनी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

१५ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता शिवसेनेची शिवसेना भवनात पत्रकार परिषद होणार त्याआधी ज्या फाईल ज्यांना दाखवायच्या आहेत त्यांना दाखवून घ्या. ही माझी नाही तर पक्षाची पत्रकार परिषद असेल, शिवसेनेची असेल. त्याआधी महाविकास आघाडी सरकारची पत्रकार परिषद होईल. मुंबई आणि महाराष्ट्रा बद्दल हायकोर्ट आणि संपूर्ण जगामध्ये वाहवाह झाली, मात्र त्याबद्दल अनेकांच्या मनात सल आहे, पुण्यातील कोरोना केंद्र, मुंबईतील कोविड केंद्र याबाबत अनेक संभ्रम निर्माण केले जात आहेत.

भाजप वाल्यांना गुन्हे दाखलचं करायचे असतील तर युपी, वाराणसी, काशीमध्ये जाऊन करा. कोरोना काळामध्ये तिथे हजारो मृतदेह वाहून गेले. आमच्या इथे गंगेत मृतदेह वाहून टाकले गेले नाहीत. गुजरातमध्ये दोन दोन दिवस अंत्यसंस्कारासाठी ज्या रांगा लावण्यात आल्या होत्या, त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा, त्या सरकारने केलेल्या घोटाळ्यांची चौकशीची मागणी केंद्र तपास यंत्रणांकडून करा.

महाराष्ट्राने अचानक उद्भवलेल्या संकटाला कशा प्रकारे सामना करून आटोक्यात आणले ते सर्व देशाने पाहिले. त्यामुळे चांगल्यावर सुद्धा कोणी जर भुंकत असले तर त्याकडे महाराष्ट्रातील जनता दुर्लक्षच करणार. कोणत्याही कोविड सेंटरमध्ये, कोणाताही घोटाळा झालेला नाही हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. तरी पण कुणी भूंकत असेल, तर भुंकू द्या त्यांना सवय असते.” अशी टीकाही राऊत यांनी केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular