28.3 C
Ratnagiri
Thursday, February 12, 2026

दहावी – बारावी परीक्षेपूर्वी बोर्डाचं ‘डिजिटल शस्त्र’

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उत्व माध्यमिक शिक्षण...

रत्नागिरीत ‘जनसुरक्षा’ कवच भक्कम जीवनज्योती विमा

सामान्य नागरिकांना आर्थिक प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकारने...
HomeRatnagiriमिरजोळेमध्ये दुचाकीस्वाराच्या अंगावर लोखंडी बार पडल्याने, स्वार गंभीर

मिरजोळेमध्ये दुचाकीस्वाराच्या अंगावर लोखंडी बार पडल्याने, स्वार गंभीर

बोलेरो गाडीचा हौदयाची हाईट गेजच्या लोंखडी बारला धडक बसली आणि लोखंडी खांब खाली निखळून दुचाकी स्वाराच्या अंगावर पडला.

रत्नागिरी मधील मिरजोळे एमआयडीसी येथिल आतल्या रस्त्यावर बोलेरो गाडीच्या धक्क्याने लोखंडी बार दुचाकीस्वाराच्या अंगावर पडल्याने स्वार गंभीर जखमी झाला आहे. योगेश यशवंत पिलणकर रा.कुवारबाव, रत्नागिरी हा बुधवारी सकाळी आपल्या ताब्यातील बोलेरो गाडी एमएच-०८-एपी-०४०४  घेऊन कांचन हॉटेल ते एमआयडीसी मिरजोळे असा जात होता. त्याचवेळी पवनकुमार नागनाथ पाटील हा आपल्या दुचाकीने एमएच-०८-एटी-८३४२ गिरीष जोशी यांना सोबत घेऊन त्याच रस्त्याने जात होते.

ही दोन्ही वाहने कोकण रेल्वे बोगद्याच्या अलीकडे हाईट गेजजवळ आली असता बोलेरो गाडीचा हौदयाची हाईट गेजच्या लोंखडी बारला धडक बसली आणि लोखंडी खांब खाली निखळून दुचाकी स्वाराच्या अंगावर पडला. यात दुचाकीस्वाराला गंभीर दुखापत झाला असून, पाठीमागे बसलेला एकजण जखमी झाला आहे. बुधवारी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान ही घटना कांचन हॉटेल ते वेरॉन कंपनीकडे जाणार्‍या अंतर्गत रस्त्यावर घडली. त्यामुळे दोन्ही वाहनांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.

त्यानुसार पवनकुमार नागनाथ पाटील वय ३४, रा. गयाळवाडी फाटा खेडशी, रत्नागिरी यांनी याबाबत ग्रामीण पोलिसा स्थानकात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार योगेश यशवंत पिलणकर रा.कुवारबाव, रत्नागिरी या बोलेरो पिक अप चालकावर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे महामार्गाप्रमाणे, अंतर्गत रस्त्यांवर सुद्धा अशा प्रकारचे गंभीर अपघाताचे सत्र सुरु असल्याचे समोर आले आहे. जखमींना रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अधिकचा तपास पोलिसांमार्फत सुरु करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular