25.7 C
Ratnagiri
Monday, December 23, 2024

मोदींनी जनतेचा खिसा कापला, पॉपकॉर्नपासून जुन्या कारपर्यंत जीएसटी वाढला

आधीच महागाईत होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देण्याऐवजी मोदी...

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाला ८५ ‘एमबीबीएस’ डॉक्टर

जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदाचा आणि...

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी पुढाकार, गडकिल्ले संवर्धन

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या...
HomeRatnagiriस्थानिकांनी परराज्यातील बोट पकडून दिली मत्स्य विभागाच्या ताब्यात, परंतु, कारवाई कधी?

स्थानिकांनी परराज्यातील बोट पकडून दिली मत्स्य विभागाच्या ताब्यात, परंतु, कारवाई कधी?

रत्नागिरी मत्स्य व्यवसाय खाते काहीच कारवाई करत नसल्याने शहराजवळील मिऱ्याबंदर येथे बेकायदेशीरपणे मासेमारी करणारी परराज्यातील यांत्रिकी नौका स्थानिक मच्छिमारांनी पकडली.

मच्छिमार व्यवसायावर मागील बऱ्याच महिन्यापासून काही ना काही संकटे येतच आहेत. एकतर कोरोनामुळे मागील २ वर्ष तरी व्यवसायावर बंदीच घालण्यात आली होती. त्यानंतर आलेली नैसर्गिक संकटे, मासेमारी कायद्यातील बदल, डीझेल परतावा, पारंपारिक, एलईडी मासेमारी, फास्टर बोटची मासेमारी, परप्रांतीय नौकांचा धुडगूस यामुळे एक प्रकारे मासेमारी व्यवसायावर संक्रांतच आली आहे.

बेकायदेशीर मासेमारी करायला आलेल्या परराज्यातील नौकानी तर समुद्रात हैदोस घातल्याने मच्छीमार सुद्धा हैराण झाले आहेत. मत्स्य विभागाकडे त्याप्रमाणे तक्रार सुद्धा नोंदवली असून रत्नागिरी मत्स्य व्यवसाय खाते काहीच कारवाई करत नसल्याने शहराजवळील मिऱ्याबंदर येथे बेकायदेशीरपणे मासेमारी करणारी परराज्यातील यांत्रिकी नौका स्थानिक मच्छिमारांनी पकडली. त्यानंतर त्या नौकेवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी मच्छिमारांनी मत्स्य विभागातील अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिल्याची घटना काल घडली.

या परराज्यातील यांत्रिकी नौकेचे नाव जॉफी आयएनडी-टीएन-१५ एमएम-७२४८ असे आहे. ही नौका पकडल्यानंतर मच्छिमारांनी तत्काळ मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधला. त्यानंतर अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. आणि मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी नौकेवरील खलाशांची विचारपूस केली असता एका स्थानिकाने या नौकेला बोलावल्यानेच ती मिऱ्याबंदर येथे आल्याचे स्पष्ट झाले.

दरम्यान, मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी मिऱ्याबंदर येथे कारवाई न करता ती यांत्रिकी नौका मिरकरवाडा बंदरात घेऊन गेले. नौका ताब्यात घेतल्यानंतर मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी काय कारवाई केली आणि ती कारवाई कधी केली जाणार ! असा प्रश्न मच्छिमारांना पडला असल्याचे विशाल मुरकर, विरेंद्र नार्वेकर, अतुल भुते, दत्तगुरु कीर, रणजित भाटकर, श्रीदत्त भुते, आप्पा वांदरकर यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular