27.4 C
Ratnagiri
Friday, August 1, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeMaharashtraमराठी भाषेला "अभिजात" दर्जा मिळविण्यासाठी सतत प्रयत्नशील - मंत्री सुभाष देसाई

मराठी भाषेला “अभिजात” दर्जा मिळविण्यासाठी सतत प्रयत्नशील – मंत्री सुभाष देसाई

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा या मागणीची चार हजार पोस्ट कार्डस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रपतींना रवाना करण्यात आली आहेत.

मराठी भाषेला “अभिजात” दर्जा प्राप्त व्हावा यासाठी मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या नेतृत्वाखाली एक जन अभियान सुरू करण्यात आले आहे. हा अभिजात दर्जा २७  फेब्रुवारी २०२२ रोजी मराठी भाषा गौरव दिवस आहे, त्याआधी मिळावा, यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू केले आहेत. इतर पक्षांच्या नेत्यांनी सुद्धा या मागणीवर लक्ष केंद्रित केले आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा या मागणीची चार हजार पोस्ट कार्डस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रपतींना रवाना करण्यात आली आहेत.याप्रसंगी वर्षा शासकीय निवासस्थानी मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, खासदार अरविंद सावंत उपस्थित होते.

गेली अनेक वर्षे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पण अद्याप याबाबत ठोस निर्णय काही झालेला नाही. यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा चालू आहे. या पार्श्वभूमीवर मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली एक जनअभियाना अंतर्गत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे याचिका पाठवण्यात येणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते चार हजार पोस्ट कार्ड्स राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पाठविण्यात आली आहेत. हा पोस्ट कार्ड्स पाठविण्याचा दुसरा संच आहे. याआधी सुद्धा एक संच राष्ट्रपतींना पाठविण्यात आला आहे.

मराठी भाषेला तात्काळ अभिजात दर्जा मिळण्याचा प्रश्न पूर्णत्वास नेण्यासाठी मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई हे केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल आणि जी. कृष्णा रेड्डी यांची दिल्लीत प्रत्यक्ष भेट घेणार आहेत. दरम्यान गरज भासल्यास ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याशी देखील दूरध्वनीवरून संपर्क साधणार असल्याचे त्यांनी सांगितले. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याासाठी आग्रहाची विनंती करणार आहोत, अशी माहिती यावेळी सुभाष देसाई यांनी दिली.

RELATED ARTICLES

Most Popular