23.2 C
Ratnagiri
Monday, December 23, 2024

मोदींनी जनतेचा खिसा कापला, पॉपकॉर्नपासून जुन्या कारपर्यंत जीएसटी वाढला

आधीच महागाईत होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देण्याऐवजी मोदी...

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाला ८५ ‘एमबीबीएस’ डॉक्टर

जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदाचा आणि...

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी पुढाकार, गडकिल्ले संवर्धन

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या...
HomeRatnagiriनांगरलेल्या बोटीवरून पडून खलाशाचा मृत्यू

नांगरलेल्या बोटीवरून पडून खलाशाचा मृत्यू

समुद्र किनाऱ्यावर नांगरून ठेवण्यात आलेल्या बोटीवर दंगा मस्ती करताना एका खलाशाचा तोल गेला. तो समुद्रात बेपत्ता झाला.

रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा येथे एका खलाशाचा मृतदेह आढळून आला आहे. मिरकरवाडा येथील जेटीवर बोट नांगरून ठेवण्यात आली होती. त्या बोटीवर दंगा मस्ती करत असताना तोल जाऊन समुद्राच्या पाण्यात एक खलाशी पडला. त्या खलाशाचा मृतदेह रविवारी आढळून आला आहे. मृत्युमुखी पडलेल्या खलाशाचे नाव प्रदेश जगना चौधरी थारु वय ३७, मूळ रा.नेपाळ सध्या रा.मिरकरवाडा जेटी,रत्नागिरी असे आहे.

दुसर्या दिवशी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास दोन नंबरच्या जेटीवर खलाशाचा मृतदेह आढळून आला आहे. याबाबत महम्मद अली अब्दुल सत्तार राजपूरकर वय ३५,  रा. खडप मोहल्ला मिरकरवाडा, रत्नागिरी यांनी शहर पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी १० वा.च्या दरम्यात मिरकरवाडा जेटी येथे उभ्या बोटीवर हा खलाशी दंगा करत होता. त्यावेळी अचानक त्याचा तोल गेला आणि तो समुद्राच्या पाण्यात पडून बेपत्ताच झाला. त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला गेला परंतु, तो काही हाती लागला नाही. त्यामुळे पोलिसांना खबर दिल्यावर याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याचा अधिक तपास पोलिस करत आहेत.

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, समुद्र किनाऱ्यावर नांगरून ठेवण्यात आलेल्या बोटीवर दंगा मस्ती करताना एका खलाशाचा तोल गेला. तो समुद्रात बेपत्ता झाला. दुसर्या दिवशी सकाळी त्या बेपत्ता खलाशाचा मृतदेह तरंगू लागल्याने, लगेचच पोलिसांना पाचरण करण्यात आले. सगळीकडे हीच चर्चा सुरु आहे कि, अशा प्रकारे दंगा मस्ती करणे जीवावर बेतले आहे. त्यामुळे बोटीवर सावधपणे काम करण्याचा इशारा पोलीस आणि बोटींच्या मालकांकडून दिला गेला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular