24.1 C
Ratnagiri
Monday, September 8, 2025

जागा खरेदीसाठीही मिळणार घरकुल योजनेतंर्गत आर्थिक मदत

ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांकडे स्वतःची जमीन नसल्यामुळे...

पेट्रोल पंपाच्या कंपाऊंडची संरक्षक भिंत कोसळली; सीएनजीचा पुरवठा बंद

मंडणगड मधील एचपीसीएल कंपनीच्या नोबेल ऑटो पेट्रोल...

रत्नागिरी पॅसेंजरसाठी २ ऑक्टो. ला जल फाऊंडेशनचे लाक्षणिक उपोषण

कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांच्या प्रलंबित मागण्यांकडे मध्य...
HomeMaharashtraनाणार प्रकल्प होणार महाराष्ट्रातच, स्थळाची चाचपणी सुरु आहे - राज्य पर्यटनमंत्री

नाणार प्रकल्प होणार महाराष्ट्रातच, स्थळाची चाचपणी सुरु आहे – राज्य पर्यटनमंत्री

शिवसेनेची पहिल्यापासूनच भूमिका राहिली आहे की जो काही उद्योग धंदा इथे उभारेल त्यामध्ये प्रथम प्राधान्य स्थानिकांना रोजगार उपलब्ध होण्याकडे असला पाहिजे.

राजापूर मध्ये होणाऱ्या नाणार अणुउर्जा प्रकल्पाला अनेक वर्षे मोठ्या प्रमाणात विरोध केला जात आहे. परंतु, कालांतराने त्या प्रकल्प बाबतचा विरोध मावळू लागला आहे. त्यामुळे अखेर शिवसेना सुद्धा प्रकल्प उभारणी करण्यासाठी योग्य स्थळाचा शोध घेत आहे.नाणार रिफायनरी प्रकल्पाला भूमिपुत्रांचा विरोध होता. शिवसेनेची पहिल्यापासूनच भूमिका राहिली आहे की जो काही उद्योग धंदा इथे उभारेल त्यामध्ये प्रथम प्राधान्य स्थानिकांना रोजगार उपलब्ध होण्याकडे असला पाहिजे. इथे इंडस्ट्री आली पाहिजे. शाश्‍वत विकासाच्या ध्येयाला आपण पकडून पुढे गेले पाहिजे.

प्रदूषण होत असेल आणि स्थानिक भूमिपुत्रांचा विरोध असेल तिथे प्रकल्प होणार नाही. हे शिवसेनेने आधीच स्पष्ट केले आहे. मात्र, महाराष्ट्रात ती इंडस्ट्री राहील. हा प्रकल्प कुठे नेता येईल, याची चाचपणी करून पुढे जात आहोत. जिथून मागणी येईल, तसे ते काम पुढे नेले जाईल, हा प्रकल्प कुठे करायचा, याबाबतची चर्चा सुरू आहे,” असे प्रतिपादन राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी सिंधुदुर्ग दौर्यावर असताना मालवण तारकर्लीत येथे केले आहे.

तारकर्लीतील आरमार  या अत्याधुनिक स्कूबा डायव्हिंग नौकेच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. आदित्य ठाकरे म्हणाले, ‘‘कोकणाला नैसर्गिक सौंदर्या लाभलेले आहे. या निसर्गरम्यतेमुळेच पर्यटक मोठ्या प्रमाणात येथे दाखल होतात आणि स्थानिक लोकांना सुद्धा रोजगार प्राप्त होतो. त्यामुळे येथील निसर्गाला हात लावता येणार नाही. पर्यावरणपूरक वातावरण आहे. त्यामुळे येत्या काळात कृषी पर्यटनाला वाव देण्याचा प्रयत्न करत आहोत. येथील भूमीला शोभेल,  असेच पर्यटन उद्योग वाढविण्यावर भर देणार आहोत.

RELATED ARTICLES

Most Popular