24.5 C
Ratnagiri
Tuesday, September 9, 2025

जागा खरेदीसाठीही मिळणार घरकुल योजनेतंर्गत आर्थिक मदत

ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांकडे स्वतःची जमीन नसल्यामुळे...

पेट्रोल पंपाच्या कंपाऊंडची संरक्षक भिंत कोसळली; सीएनजीचा पुरवठा बंद

मंडणगड मधील एचपीसीएल कंपनीच्या नोबेल ऑटो पेट्रोल...

रत्नागिरी पॅसेंजरसाठी २ ऑक्टो. ला जल फाऊंडेशनचे लाक्षणिक उपोषण

कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांच्या प्रलंबित मागण्यांकडे मध्य...
HomeRatnagiriबावनदीतील गळ उपसा करण्यासाठी लोकसहभाग आणि नाम फाउंडेशनचे सहाय्य

बावनदीतील गळ उपसा करण्यासाठी लोकसहभाग आणि नाम फाउंडेशनचे सहाय्य

पालकमंत्री अनिल परब आणि जिल्हाधिकारी बी. एन. पाटील आणि विशेष आभार नाम फाउंडेशनचे आभार मानण्यात आले आहेत.

रत्नागिरी तालुक्यातील संगमेश्वर बावनदी काठावर असलेल्या गावांना दर वर्षी पुराचा धोका निर्माण होतो. अनेकांना आपले घर सोडून जीव मुठीत धरून राहावं लागत आहे. या पावसाळ्यामध्ये आलेल्या पुराच्या पाण्यामुळे अनेकांचे लाखोंचे नुकसान झाले. त्यामुळे काठावर वसलेल्या आणि दरवर्षीच्या पुराच्या पाण्याच्या त्रासाला कंटाळलेल्या वांद्री उक्षीचे ग्रामस्थांनी बावनदीचा गाळ उपसण्याचा निर्णय घेतला आहे. हा बावनदीचा गाळ लोकसहभागातून आणि विशेष म्हणजे नाम फाउंडेशनच्या मदतीने उपसला जाणार आहे. यासाठी अनेक दिवस पाठपुरावा सुरु असून नाम फाउंडेशननी गाळ उपसासाठी पुढाकार घेतला असून लवकरच वांद्री – उक्षी परिसरातिला गाळ उपसा प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे.

गाळ उपसा साठी लोकसहभाग महत्वाचा असून गावातील प्रमुख लोकांची बैठक वांद्री येथे पार पडली असून अनेकांनी हात भार लावण्यासाठी प्राथमिकता दर्शवली असल्याचे सांगितले आहे. या परिसरातील क्रशर वाल्यांचा गाळ आणि रेल्वेचा भराव उंच उतारातून नदीत येऊन नदीच्या गाळा मुळे लवकरच पाणी भरत आणि त्याचा त्रास सहन करावा लागतो.

काही दिवसा पूर्वीच रत्नागिरी जिल्हाधिकारी बी. एन. पाटील यांची भेट घेऊन या गाळ उपसासाठीच्या इंधन मदतीसाठी पत्र व्यवहार करण्यात आला असून, जिल्हाधिकारी पाटील यांनी या पत्राला सकारात्मकपणे घेत लवकरच या परिसरातील नदीची पाहणी करणार असल्याचे सांगितले. गाळ उपसा साठी रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांची भेट घेतली गेली असून त्यांनी जिल्हाधिकारी यांनी गाळ उपसा साठी मदत करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पालकमंत्री अनिल परब आणि जिल्हाधिकारी बी. एन. पाटील आणि विशेष आभार नाम फाउंडेशनचे आभार मानण्यात आले आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular