29.1 C
Ratnagiri
Sunday, August 3, 2025

‘अनारक्षित मेमू रेल्वे’ बाबत नाराजी कोकण विकास समिती

गणेशोत्सवासाठी मध्यरेल्वेने जाहीर केलेल्या दिवा चिपळूण आणि...

दाभिळ, उन्हवरे, पानवळेत बीएसएनएलचे ‘नो नेटवर्क’

दापोली तालुक्यातील गावतळे बाजारपेठेसह उन्हवरे, दाभिळ, पावनळ...

चिपळूण रेल्वे स्टेशनला जोडणाऱ्या मार्गाची दुरवस्था

शहरातून कोकण रेल्वेस्टेशनकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्याची सध्या...
HomeSportsके एल राहुलची नवोदित खेळाडूच्या उपचारासाठी मदत

के एल राहुलची नवोदित खेळाडूच्या उपचारासाठी मदत

वरद या खेळाडूच्या आजाराबद्दल के एल राहुल याला समजले असता तो तातडीची बोन मॅरो ट्रान्सप्लांटची गरज असलेल्या ११ वर्षीय नवोदित क्रिकेटपटूच्या मदतीला धावून गेला आहे.

विविध क्षेत्रातील खेळाडू, कलाकार कायमच कोणत्या न कोणत्या कारणावरुन चर्चेत असतात. एखाद्याला गरजेच्या वेळेला केलेली मदत त्याचे आयुष्य बदलून टाकते. आणि ती केलेली मदत कायम लक्षात सुद्धा राहते. वरद नलावडे नामक एक नवोदित खेळाडूच्या बाबतीत अशा प्रकारे केलेली मदत नक्कीच त्याच्यासाठी वरदान ठरली आहे.

वरद हा नवोदित क्रिकेटपटू असून, डिसेंबरमध्ये, त्याला ऍप्लास्टिक अॅनिमिया या दुर्मिळ रक्त विकाराचे निदान झाले आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांटची  गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. वरद नलावडेचे वडील सचिन हे एक विमा एजंट आहेत आणि आई स्वप्ना यांनी त्यांच्या मुलाच्या उपचारासाठी आवश्यक असलेले ३५ लाख रुपये उभे करण्याची मोहीम सुरू केली. क्राउड फंडिंगद्वारे त्या उपचारासाठी पैसे जमा करत आहेत.

वरद या खेळाडूच्या आजाराबद्दल के एल राहुल याला समजले असता तो तातडीची बोन मॅरो ट्रान्सप्लांटची गरज असलेल्या ११ वर्षीय नवोदित क्रिकेटपटूच्या मदतीला धावून गेला आहे. त्याने दुर्मिळ रक्त विकाराच्या उपचारासाठी ३१ लाख रुपयांची मदत देऊ केली आहे.

वरदची माहिती मिळताच राहुलच्या टीमने मोहिमेशी संबंधित संस्थेशी संपर्क साधला. गेल्या सप्टेंबरपासून, पाचवीत शिकणाऱ्या वरदचे ऍप्लास्टिक अॅनिमिया या दुर्मिळ रक्त विकाराचे निदान झाल्यानंतर तो मुंबईच्या जसलोक रुग्णालयात हेमॅटोलॉजिस्टच्या देखरेखीखाली होता. वरदच्या रक्तातील प्लेटलेटसची पातळी खूपच कमी होती, ज्यामुळे त्याची रोगप्रतिकारक शक्ती संक्रमणास अत्यंत संवेदनशील बनत चालली होती.

त्यामुळे प्रतिकारकशक्ती नाजूक झाल्याने जरी साधा ताप देखील बरा व्हायला काही महिन्यांचा कालावधी लागत आहे. वरदच्या आजारावर बीएमटी (बोन मॅरो ट्रान्सप्लांट) हा एकमेव कायमस्वरूपी इलाज होता.

के.एल. राहुल म्हणाला, “जेव्हा मला वरदच्या प्रकृतीबद्दल कळले तेव्हा माझ्या टीमने गिव्ह इंडियाशी संपर्क साधला जेणेकरून आम्ही त्याला कोणत्याही प्रकारे मदत करू शकू. वरदची शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि आता त्याची प्रकृती बरी असल्याचा मला आनंद आहे. त्यासोबतच राहुलने त्याच्या भावी निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा देत म्हटल कि, मला आशा आहे की वरद लवकरात लवकर त्याच्या पायावर उभा राहील आणि त्याची स्वप्ने पूर्ण करेल.

RELATED ARTICLES

Most Popular