25.1 C
Ratnagiri
Thursday, November 21, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeInternationalरशिया आणि युक्रेन युद्ध सुरु,१३७ जणांनी प्राण गमावला

रशिया आणि युक्रेन युद्ध सुरु,१३७ जणांनी प्राण गमावला

रशियाने जर नाटोच्या सदस्य देशासाठी धोका निर्माण केला तर, नाटो आणि पाश्चिमात्य राष्ट्रांसाठी ही गोष्ट धोकादायक ठरणार आहे.  

रशिया आणि युक्रेन यांच्यात शस्त्रात्रांसहीत सुरू असलेल्या संघर्षाचा आजचा दुसरा दिवस आहे. रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्याच्या पहिल्याच दिवशी जवळपास १३७ जणांनी प्राण गमावल्याचा दावा युक्रेनकडून करण्यात आला आहे. तसंच या हल्ल्यात ३१६ जण गंभीर जखमी देखील झाले आहे. मृतांमध्ये सामान्य नागरिक आणि जवानांचा देखील समावेश आहे.

रशियानं युक्रेनच्या विरोधात उचललेली पावलं आणि त्या पार्श्वभूमीवर अनेकजण भारतावर याचा किती परिणाम होईल यावर विचार करत आहेत. रशियाने केलेल्या युद्धाच्या विधानामुळे आणि कृत्यामुळे अनेक पाश्चात्य देशांना निर्बंध आणि इतर गोष्टींचा मार्ग स्वीकारावा लागला आहे.  सध्या रशिया आणि युक्रेनच्या सीमेवर जी स्थिती आहे ती कितीही वाईट असली तरी अद्याप नाटो आणि रशियाच्या लष्करामध्ये थेट संघर्ष पाहायला मिळालेला नाही.

प्रत्यक्षात, जेव्हा रशियानं युक्रेनवर आक्रमण करण्यासाठी सैन्य उभारणी करण्यास सुरुवात केली त्यावेळी अमेरिका आणि ब्रिटन यांनी पूर्णपणे नाराजी व्यक्त केली होती. तिसर महायुद्ध होणार अशी चिन्ह दिसून आल्याने इतर राष्टानीही लगेचच काही प्रमाणात सुरक्षा सल्लागार आणि लष्करी प्रशिक्षक सक्रिय केले. रशियाने जर नाटोच्या सदस्य देशासाठी धोका निर्माण केला तर, नाटो आणि पाश्चिमात्य राष्ट्रांसाठी ही गोष्ट धोकादायक ठरणार आहे.

नाटो म्हणजे नॉर्थ अॅटलॅंटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन. नॉर्थ अॅटलॅंटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन ही संरक्षण विषयासाठी एकत्र आलेल्या २९ देशांची संघटना आहे. अमेरिकेने तेंव्हा सोव्हियत युनियनला टक्कर देण्यासाठी २८ देशांच्या साहाय्याने ही संघटना स्थापन केली होती. १९४९ मध्ये त्यामध्ये युनायटेड स्टेट्स, ब्रिटन, फ्रान्स, कॅनडा, इटली, बेल्जियम, लक्झेंबर्ग, नॉर्वे,  नेदरलँड्स, आइसलँड,  पोर्तुगाल आणि डेन्मार्क यांच्यासह १२ देशांचा समावेश होता. आता यामध्ये २९ देश समाविष्ट आहेत. नाटोमधील देशांना अमेरिका, संरक्षण करारांमध्ये मोठी सूट देतं. नाटोच्या कलम ५ नुसार कोणत्याही सदस्य राष्ट्रावर हल्ला झाल्यास, संपूर्ण पाश्चिमात्य लष्करी आघाडीला त्याच्या संरक्षणासाठी येणं अनिवार्य असते.

युक्रेननं नाटोमध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली असली,  तरी अद्याप तो देश नाटोचा सदस्य नाही. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना तेच होण्यापासून रोखायचं आहे. जर युक्रेनदेखील नाटोमध्ये समाविष्ट झालं तर, रशियाच्या सीमा पूर्णपणे घेरल्या जातील. आणि युक्रेन नाटोमध्ये गेल्यास भविष्यात नाटोची क्षेपणास्त्रं काही मिनिटांत युक्रेनच्या भूमीवर उभी राहतील. हे रशियासाठी मोठं आव्हान ठरू शकत,  असा युक्तिवाद पुतिन यांनी केला आहे.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन गुरुवारी सकाळीच युक्रेनमध्ये विशेष लष्करी कारवाईची घोषणा करत युद्ध घोषणा केली आहे. युक्रेनची राजधानी ‘कीव’ स्फोटांच्या आवाजांनी दणदणून गेली आहे. पुतीन यांनी युक्रेन-रशिया युद्धात कोणत्याही देशानं घुसण्याचा प्रयत्न केला तर त्याचे भयंकर परिणाम दिसून येतील  अशी धमकी दिली आहे. रशिया स्वत:च्या संरक्षणासाठी काहीही करण्यास तयार असल्याचंही पुतीन यांनी स्पष्ट केल आहे.

RELATED ARTICLES

Most Popular