23.1 C
Ratnagiri
Sunday, December 22, 2024

मोदींनी जनतेचा खिसा कापला, पॉपकॉर्नपासून जुन्या कारपर्यंत जीएसटी वाढला

आधीच महागाईत होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देण्याऐवजी मोदी...

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाला ८५ ‘एमबीबीएस’ डॉक्टर

जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदाचा आणि...

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी पुढाकार, गडकिल्ले संवर्धन

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या...
HomeMaharashtraमालाड मधील “त्या” मैदानाच्या नामकरणाचा वाद विकोपाला

मालाड मधील “त्या” मैदानाच्या नामकरणाचा वाद विकोपाला

टिपू सुलतान या नावावरून वाद होत असतानाच महापौर किशोरी पेडणेकर यांनी झाशीच्या राणीचे नाव उद्यानाला द्यावे अशी मागणी शिवसेनेची असल्याचे म्हटले होते.

मालाड मधील मैदानाच्या नामकरणाचा वाद पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. सध्या मालाड  येथील मैदानाला नाव टिपु सुलतान दिलेले आहे तर ते बदलून झाशीची राणी लक्ष्मीबाई मैदान नाव देण्याचा प्रस्ताव बाजार आणि उद्यान समितीत मंजूर झाला आहे. समाजवादी पक्षाकडून या नव्या नामकरणाला विरोध होता.

मालाड येथील मैदानाला टिपू सुलतान यांचे नाव देण्यावरून मुंबईतील राजकारण चांगलेच गरम झाले  होते. मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेच्या पी नॉर्थ विभागातील नगरसेवकांनी या उद्यानाला झाशीची राणी लक्ष्मीबाई मैदान असे नामकरण करण्याची मागणी केली होती. त्याबाबतचा प्रस्ताव बाजार व उद्यान समितीमध्ये मंजूर झाला असून पालिका आयुक्तांच्या अभिप्रायानंतर नामकरण केले जाणार आहे.

मालाड येथील कलेक्टरच्या अखत्यारित भूखंडावर उद्यान असून त्याचे सुशोभीकरण मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केले. या उद्यानाला कित्तेक वर्षे टिपू सुलतान या नावाने ओळखले जात असल्याने उद्यानाच्या प्रवेशद्वारावर टिपू सुलतान उद्यान असे नाव लिहिण्यात आले आहे. टिपू सुलतान या नावावरून वाद होत असतानाच महापौर किशोरी पेडणेकर यांनी झाशीच्या राणीचे नाव उद्यानाला द्यावे अशी मागणी शिवसेनेची असल्याचे म्हटले होते.

समाजवादी पक्षाचे आमदार , मुंबई महापालिकेतील गटनेते रईस शेख यांनी महापौरांना विनंती पत्र देऊन, झाशीची राणी यांचे नाव देण्याचा हा प्रस्ताव मागे घेण्याची झाशीची राणी यांचे नाव मोठ्या वास्तूला द्यावे अशी मागणी केली आहे. भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्ष आपले हिंदुत्व दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. परन्तु, यामध्ये एका महापुरुषाचे नाव काढून,  दुसऱ्या महापुरुषाचे नाव वापरले जात आहे. हे कितपत योग्य आहे?  शिवसेनेने असे करणे योग्य नाही असे ते म्हणाले.

RELATED ARTICLES

Most Popular