26 C
Ratnagiri
Saturday, November 22, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeRatnagiriदेवरूखमध्ये भर वस्तीत चोरी, हजारोंच्या मुद्देमालासह पलायन

देवरूखमध्ये भर वस्तीत चोरी, हजारोंच्या मुद्देमालासह पलायन

देवरुख मध्ये गजबजलेल्या भागामध्ये चोरट्यांनी बाजू बाजूचे २ फ्लॅट फोडले असून, हजारोंचा माल घेऊन तिथून फरार झाले आहेत.  

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अनेक नागरिक हे कामा धंद्यानिमित्त मुंबई, पुणेला असून गावाकडील बाजूला फ्लॅट किंवा घर घेऊन सुट्टी किंवा काही काळ निवांत घालवण्यासाठी आधी मधी येत असतात. पण त्यामुळे अनेक भुरटे चोर अशा घरांवर किंवा फ्लॅटवर नजर ठेवून संधी मिळाली कि हात साफ करून घेतात. देवरुख मध्ये गजबजलेल्या भागामध्ये चोरट्यांनी बाजू बाजूचे २ फ्लॅट फोडले असून, हजारोंचा माल घेऊन तिथून फरार झाले आहेत.

देवरुख शहर भागातील दत्तनगर या गजबजलेल्या वस्तीतील एसव्ही प्लाझा अपार्टमेंटमधील २ बंद फ्लॅट फोडून सोने, चांदीसह रोख रक्कम असा सुमारे ६० हजारांचा ऐवज लंपास करून चोरट्यांनी पोबारा केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. एका रात्रीत दोन्ही फ्लॅट फोडल्याने, सकाळी उठल्यावर शेजार्‍यांच्या हा प्रकार निदर्शनास आला. त्यांनी त्वरित या चोरीबद्दल फ्लॅटधारक आणि पोलिसांना कल्पना दिली.

याबाबत पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, महाडिक स्टॉप येथील रस्त्यालगतच्या एसव्ही प्लाझा या इमारतीतील-विंग ए मधील पहिल्या मजल्यावरील रहिवासी बाहेरगावी गेल्याने फ्लॅट काही दिवस बंद होते. पहिल्या मजल्यावर राहणारे सुनील चव्हाण व शेजारी राहणार्‍या सुप्रिया शेट्टी हे बाहेरगावी गेल्याने ते दोन्ही प्‍लॅट बंद होते. चोरांनी चव्हाण यांच्या फ्लॅटमधील कपाट उचकटून सोने चांदीच्या अमूल्य वस्तूंसह रोख रक्कम असा सुमारे २१ हजारांचा मुद्देमाल तर शेट्टी यांचे कपाट फोडून रोख ४० हजार इतकी रक्कम चोरट्यांनी लांबविली. घर मालक बाहेरगावी असल्याने ते परत आल्यावर पोलिसांनी पंचनामा केला. रत्नागिरीतून श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. या चोरीचा छडा लावण्याचे एक प्रकारचे आव्हानच पोलिसांसमोर आहे.

RELATED ARTICLES

Most Popular