27.9 C
Ratnagiri
Sunday, August 3, 2025

कुंभार्ली घाटाचे सोनपात्र घाट असे नामांतर करण्याची सकल धनगर समाजाची मागणी

सोनबा धनगर बांधवाची आठवण सदैव टिकवून ठेवण्यासाठी...

‘अनारक्षित मेमू रेल्वे’ बाबत नाराजी कोकण विकास समिती

गणेशोत्सवासाठी मध्यरेल्वेने जाहीर केलेल्या दिवा चिपळूण आणि...

दाभिळ, उन्हवरे, पानवळेत बीएसएनएलचे ‘नो नेटवर्क’

दापोली तालुक्यातील गावतळे बाजारपेठेसह उन्हवरे, दाभिळ, पावनळ...
HomeMaharashtraभारताचा माजी फलंदाज विनोद कांबळीला वांद्रे पोलिसांनी केली अटक

भारताचा माजी फलंदाज विनोद कांबळीला वांद्रे पोलिसांनी केली अटक

इमारती खाली लहान मुले खेळत असतात, सायकल चालवत असतात परंतु, वृद्ध चालण्याचा व्यायाम करत असतात, याचे भान न ठेवता विनोदची गाडी कायमच वेगात असते.

भारतामध्ये क्रिकेट आणि क्रिकेटपटूना वेगळीच प्रसिद्धी आहे. अनेक खेळाडू या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीने जनतेच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. तर काही खेळाडू आपल्या वेगळ्या व्यक्तिमत्वामुळे, स्टाईलमुळे चर्चेत असतात. त्यातलाच एक विनोद कांबळी. आपल्या युनिक स्टाईल स्टेटमेंटमुळे कायम चर्चेत असतो परंतु, आज मात्र चर्चा वेगळ्याच गोष्टीची आहे.

डिसेंबर २०२१ मध्ये विनोद कांबळी सायबर चोरांच्या ऑनलीन फसवणुकीमुले चर्चेत आला होता. ऑनलाईन केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने कांबळी याच्या बँक खात्यामधून सायबर चोरांनी १ लाख १४ हजार रुपये परस्पर वळविले होते.

भारताचा माजी फलंदाज विनोद कांबळी त्याच्या इमारतीच्या गेटवर गाडी धडकवल्याने त्याला अटक करण्यात आली. त्याला वांद्रे पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर लगेचच जामीनावर त्याची सुटका देखील करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

विनोद कांबळी वांद्रे येथे ज्या इमारतीमध्ये वास्तव्याला आहे, त्याच इमारतीच्या गेटवर त्याची गाडी आदळली. यावरून विनोदचा वॉचमन आणि तेथील रहिवाशांसोबत वाद झाला. हा किरकोळ वाद इतक्या टोकाला गेला की इमारतीमधील रहिवाशांनी त्याच्या विरोधात पोलिसात तक्रार केली आणि त्याला मुंबई पोलिसांनी रविवारी अटक केली आहे.

याआधीही त्याची इमारतीमधील वागणूक अशाच प्रकारे असल्याने, इमारतीतील नागरिकांनी त्याच्याविरुद्ध वेगाने गाडी चालवणे,  लोकांचा जीव धोक्यात घालणे त्याच बरोबर इमारतीच्या संपत्तीला धोका पोहोचवणे आदी गुन्हे दाखल केले आहेत. इमारती खाली लहान मुले खेळत असतात, सायकल चालवत असतात परंतु, वृद्ध चालण्याचा व्यायाम करत असतात, याचे भान न ठेवता विनोदची गाडी कायमच वेगात असते. आणि जेव्हा इमारतीच्या गेटला आदळली होती तेव्हा त्याने मद्यपान केले होते असे पोलिसांनी म्हटले आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे वांद्रे पोलिसांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular