31.3 C
Ratnagiri
Thursday, February 6, 2025

कोकणच्या एक्स्प्रेस ठाणे-दादरपर्यंत रेल्वेकडून माहिती

सीएसएमटी रेल्वेस्थानकातील फलाटाच्या विस्तारीकरणाच्या कामामुळे कोकणातून मुंबईच्या...

धरणातील पाण्यापासून कोंड्येकर वंचित, चौपदरीकरणाच्या खोदकामात पाईपलाईन उखडली

तालुक्यातील कोंड्ये येथे पाटबंधारे विभागामार्फत लाखो रुपये...

गैरप्रकार आढळल्यास केंद्र मान्यता कायमची रद्द, २१ पासून दहावीच्या परीक्षा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...
HomeMaharashtraआम्ही सापाच्या पिल्लाला तीस वर्षे दूध पाजले, तेच पिल्लू वळवळ करत आहे...

आम्ही सापाच्या पिल्लाला तीस वर्षे दूध पाजले, तेच पिल्लू वळवळ करत आहे – मुख्यमंत्री

“आज इकडे धाड टाक, तर उद्या  तिकडे धाड टाकत आहेत, याला अटक करतायत, त्याला अटक करतायत.” मात्र यापुढे हे खपवून घ्यायचं नाही.

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या रामटेक या निवासस्थानी पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार सुद्धा उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, आम्ही सापाच्या पिल्लाला तीस वर्षे दूध पाजले, तेच पिल्लू वळवळ करत आहे आणि आमच्या विरोधातच फुत्कारायला लागले आहे.

आम्ही कोणावर वार करीत नाहीत,  पण जर कोणी वार आमच्यावर केला तर आम्ही सोडणार नाही. महाविकास आघाडी सरकार पडणार अशा वावडय़ा उठवताहेत, पण आमची एकजूट हीच आमची ताकद आहे. तेव्हा आमचे १७० मोहरे फोडून दाखवाच, असे आव्हान देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, महाविकास आघाडीचे मोहरे मला सोडून तुमची गुलामगिरी पत्करणार नाहीत, अशा शब्दांत भाजपवर टीकास्त्र सोडले.

देशात अत्यंत घृणास्पद राजकारण केले जात आहे. एक विकृती फोफावत आहे. विकृतीपेक्षा अत्यंत खालच्या स्तरावरचा घाणेरडेपणा सुरू आहे. “आज इकडे धाड टाक, तर उद्या  तिकडे धाड टाकत आहेत, याला अटक करतायत, त्याला अटक करतायत.” मात्र यापुढे हे खपवून घ्यायचं नाही. केंद्र सरकारच्या कोणत्याही दबावासमोर झुकू नका. केंद्रीय तपास यंत्रणांच्या सततच्या छाप्यांमुळे आपण दबून न जाता आक्रमकपणे तोंड देऊ असे मुख्यमंत्र्यांनी सूचित केले आहे.

मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि आमदारांना एक प्रकारे आधार देण्याचा प्रयत्न केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावरून या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाविकास आघाडी आक्रमकपणे आरोपांना सामोरी जाईल, हेच मुख्यमंत्र्यांनी सूचित केल्याचे बोलले जात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular