24.2 C
Ratnagiri
Monday, December 23, 2024

मोदींनी जनतेचा खिसा कापला, पॉपकॉर्नपासून जुन्या कारपर्यंत जीएसटी वाढला

आधीच महागाईत होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देण्याऐवजी मोदी...

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाला ८५ ‘एमबीबीएस’ डॉक्टर

जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदाचा आणि...

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी पुढाकार, गडकिल्ले संवर्धन

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या...
HomeMaharashtraराज्यात पुढील आठवड्यात जोरदार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा इशारा

राज्यात पुढील आठवड्यात जोरदार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा इशारा

राज्यात हवामान विभागाकडून पुढील आठवड्यामध्ये दोन दिवस राज्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

वातावरणामध्ये सततच्या घडणाऱ्या बदलामुळे कधी अवकाळी पाउस तर कधी अति उष्णता तर कधी प्रचंड थंडी. मागील दोन वर्षापासून आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे पूर्ण वातावरणामध्ये अमुलाग्र बदल घडला आहे. हिंवाळा संपून आता उन्हाची चाहूल लागायला लागली असतानांच मधीच संपूर्ण मळब सारखे निर्जीव वातावरण निर्माण होते तर काही ठिकाणी पावसाची लक्षणे दिसून येत आहेत.

राज्यात हवामान विभागाकडून पुढील आठवड्यामध्ये दोन दिवस राज्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, सोमवारी ७ मार्च रोजी पालघर जिल्ह्यात ढगाळ हवामानाची शक्यता असून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. तसेच याच दिवशी धुळे, नंदुरबार, नाशिकसह जळगाव या ठिकाणी विजांचा कडकडाट होऊन पाऊस कोसळण्याची लक्षणे दिसून येत आहेत. त्यामुळे या कालावधीमध्ये आकाशात विजा चमकत असताना, नागरिकांनी घराबाहेर पडू नये, अथवा लांबचा प्रवास टाळावा,  असा सल्ला सूचक इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

त्याचप्रमाणे कोकणात तसाही पाऊस अधिक प्रमाणातच कोसळतो. मंगळवारी ८ मार्च रोजी राज्यातील पावसाचे प्रमाण आणखी वाढणार असून कोकणासह दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. मंगळवारी , रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, पालघर, ठाणे, रायगड,सातारा, बीड, परभणी आणि हिंगोली या दहा जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरुपात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर पुण्यासह अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, औरंगाबाद आणि जालना या जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात विजांचा कडकडाटासह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES

Most Popular