24.2 C
Ratnagiri
Monday, December 23, 2024

मोदींनी जनतेचा खिसा कापला, पॉपकॉर्नपासून जुन्या कारपर्यंत जीएसटी वाढला

आधीच महागाईत होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देण्याऐवजी मोदी...

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाला ८५ ‘एमबीबीएस’ डॉक्टर

जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदाचा आणि...

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी पुढाकार, गडकिल्ले संवर्धन

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या...
HomeSportsऑस्ट्रेलियचा महान फिरकीपटू शेन वॉर्नचे दु:खद निधन

ऑस्ट्रेलियचा महान फिरकीपटू शेन वॉर्नचे दु:खद निधन

शेन वॉर्नसारख्या एका दिग्गज फिरकी गोलंदाजाला क्रीडाविश्व मुकलं आहे.

क्रिकेट विश्वातून अचानक एक धक्कादायक बातमी आली आहे. ऑस्ट्रेलियचा महान फिरकीपटू शेन वॉर्न याचे हृदयविकाराचा झटकाक्याने निधन झाले आहे. तो ५२ वर्षांचा होता. शेन वॉर्नची क्रिकेटची कारकीर्द पाहता, त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ७०० पेक्षा जास्त विकेट घेतल्या आहेत. त्याने जगातील प्रत्येक मैदानावर आपल्या दमदार गोलंदाजीने ऑस्ट्रेलियासाठी सामना जिंकून देणारी अभिमानास्पद कामगिरी  केली आहे.

ऑस्ट्रेलियाचे महान लेगस्पिनर शेन वॉर्न यांच्या अकाली एक्झिटने क्रिकेट जगताला मोठा धक्का बसला आहे. शेन वॉर्न यांचं अचानक जाणं अनेकांच्या मनाला चटका लावून गेलं आहे. काल ऑस्ट्रेलियाने एकाच दिवसात आपल्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंना गमावलं. शेन वॉर्न यांनी त्यांचं निधन होण्याच्या १३ तास आधी एक टि्वट केलं होतं. ते त्याच शेवटचं टि्वट ठरलं. शेन वॉर्न याने त्या टि्वटमधून रॉड मार्श यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला होता.

आणि पुढील २४ तासांमध्येच ऑस्ट्रेलियाने आपल्या महान दोन क्रिकेटपटूंना गमावलं आहे. हार्ट अटॅकमुळे रॉड मार्श यांना क्वीन्सलँडच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ते कोमामध्ये गेले होते. रॉयल एडलेड हॉस्पिटलमध्ये मार्श यांनी अखेरचा श्वास घेतला. तर शेन वॉर्नच्या आयुष्याचा शेवट खूपच दु:खद झाला. थायलंडच्या एका व्हिलामध्ये तो मृतावस्थेत आढळला. डॉक्टरांनी तसेच वॉर्न सोबत असलेल्या मित्रांनी सीपीआर देऊन त्याचा श्वासोच्छवास सुरु करण्याचा प्रयत्न केला. पण आलेल्या मेजर अटॅकसमोर त्याचा काहीच उपयोग झाला नाही.

जगातील एकदम अव्वल फिरकीपटू सोबतच एक दिग्गज कर्णधार अशी शेन वॉर्नची ख्याती आहे. शेन वॉर्नसारख्या एका दिग्गज फिरकी गोलंदाजाला क्रीडाविश्व मुकलं आहे. ऑस्ट्रेलियाकडून अनेक वर्षापासून क्रिकेट खेळलेला शेन वॉर्न क्रिकेट जगतात बहुतेक सर्वांना माहित आहे.

RELATED ARTICLES

Most Popular