27.6 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

मुहूर्ताच्या दिवशी पावसाचा खोडा केवळ २० टक्के नौका समुद्रात

शुक्रवारपासून मासेमारीवरील बंदी उठल्यानंतर पहिल्याच दिवशी स्थानिक...

“आम तो आम और गुटली का भी दाम” असा हा प्रकल्प : अनिकेत सुर्वे

"आता वाटद दशक्रोशीतील युवकांनी निर्धार केला आहे,...

स्मार्ट वीजमीटरचा निर्णय रद्द करायला लावू – लियाकत शाह

स्मार्ट वीजमीटर बसवल्यानंतर वाढीव वीजबिले येत असल्याच्या...
HomeRatnagiriमहामार्गावर दुचाकीसमोर बिबट्याची उडी, वाहनचालकांची भंबेरी

महामार्गावर दुचाकीसमोर बिबट्याची उडी, वाहनचालकांची भंबेरी

अचानक समोर बिबट्या उभा राहिल्याने, सर्वच जण घाबरून गेले. परंतु, महामार्गावर गाड्या आणि गर्दी दिसून आल्याने, बिबट्याने तिथून धूम ठोकली.

रत्नागिरी महामार्गावर वन्य प्राण्यांचा राजरोस वावर सुरु आहे. त्यामुळे एकटे दुकटे वाहनावरून येताना वाहनचालक सुद्धा जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत. बिबट्याचा वावर तर संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खुलेआम सुरु आहे. जंगलाच्या बाजूला असणाऱ्या अनेक गावांमध्ये वाडी वस्तीमध्ये बिबट्यासारखे वन्य प्राणी शिरकाव करून लागले आहे. त्यामुळे पाळीव प्राणी आणि मनुष्य वस्तीवर सुद्धा हल्ले वाढू लागले आहेत.

रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरुन पानवलजवळ काल रात्री दुचाकी स्वारासमोर अचानक बिबट्याने झडप घातल्याने दुचाकीस्वार सचिन बेंद्रे यांची भंबेरी उडाली. अचानक गाडीच्या समोर उडी मारल्याने दुचाकीस्वार गोंधळून गेला परंतु, सुदैवाने तो बचावला. ही खळबळजनक घटना रात्री ८.३० वाजण्याच्या दरम्यान घडली.

अचानक बिबट्याने मारलेल्या उडिमूळे दुचाकी चालक हे घाबरले परंतु त्याही स्थितीमध्ये स्वतःला सावरून त्यांनी दुचाकी पुढे नेली. बेंद्रे हे सकाळी काही कामानिमित्ताने रत्नागिरीत आले होते. त्यांना काम आटपून घरी जाण्यास सायंकाळी थोडा उशीर झाला होता. मित्रांची भेट घेऊन रात्री ते जाकादेवीकडे निघाले.

त्यांची दुचाकी पानवल येथील चांदसूर्या वळणाजवळ आली असता, त्याचवेळी बिबट्याने दुचाकी समोर उडी मारली. बेंद्रे यांच्या गाडी मागोमाग एक चारचाकी गाडी येत होती. अचानक समोर बिबट्या उभा राहिल्याने, सर्वच जण घाबरून गेले. परंतु, महामार्गावर गाड्या आणि गर्दी दिसून आल्याने, बिबट्याने तिथून धूम ठोकली.

सुदैव म्हणून यामध्ये कोणालाही दुखापत झाली नाही. बेंद्रे यांच्यासह सर्वजणं सुखरूप आपापल्या घरी निघून गेले. चांदसुर्या हा भाग महामार्गावरच येत असल्यामुळे वाहनांची वर्दळ हि कायमच असते. परंतु, रस्ता काळोखा असल्याने आणि बाजूला जंगलमय परिसर असल्यामुळे कोणताही प्राणी रस्त्यावर आला तर त्याचा पटकन अंदाज येत नाही. मागील आठवड्यामध्ये सुद्धा काही स्थानिकांना बिबट्याने दर्शन दिले असल्याने काही प्रमाणात या परिसरातील ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular