24.9 C
Ratnagiri
Sunday, November 23, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeRatnagiriसांगलीतील वृध्द जोडप्याची भोंदूबाबाकडून लाखोंची फसवणूक

सांगलीतील वृध्द जोडप्याची भोंदूबाबाकडून लाखोंची फसवणूक

सांगलीतील वृध्द जोडप्याची जादूटोणाव्दारे दुखापत पूर्ण बरी करतो अशी बतावणी करत लाखोंची फसवणूक करणार्‍या भोंदुला ग्रामीण पोलिसांनी अटक केली.

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अनेक भोंदूगिरी करणाऱ्या बाबांची अनेक प्रकरणे घडत आहेत. नुकत्याच एका वृद्ध दाम्पत्याला अशा एका भिंदू बाबाने दागिने लांबवून फसविण्यात यश आले आहे. सांगलीतील वृध्द जोडप्याची जादूटोणाव्दारे दुखापत पूर्ण बरी करतो अशी बतावणी करत लाखोंची फसवणूक करणार्‍या भोंदुला ग्रामीण पोलिसांनी अटक केली. रविवारी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

मुस्ताक इसा काझी वय ५०, रा. केळ्ये मजगाव, रत्नागिरी असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात जगन्नाथ सदाशिव पोतदार वय ७२, रा. शिराळ, सांगली यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, जगन्नाथ पोतदार यांच्या पत्नीच्या उजव्या पायाला जखम झाली होती. वैद्यकिय उपचार करुनही ती बरेच दिवस बरीच होत नव्हती. तेव्हा पोतदार यांच्या एका मित्राने त्यांना मुस्ताक काझीची माहिती देउन ते हा आजार बरा करतीलच असे विश्वासाने त्यांना सांगितले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून सदाशिव पोतदार पत्नीसह मुस्ताक काझी यांना भेटण्यास आले.

त्या भोंदू काझीने त्यांच्या पत्नीकडून आजाराविषयी माहिती घेतली असता माझे दागिने एका बाईने लग्नात घालण्यासाठी घेतले होते. परंतु, खूप काळ तिने ते परत केले नाहीत. बऱ्याचदा मागितल्यानंतर काही काळापर्यंत ते परत केल्यापासून मी आजारी असल्याचे त्यांनी सांगितले. याच गोष्टीचा फायदा घेत काझीने त्यांच्या कडील सोन्याचे दागिने मागवून घेत त्यांच्यावर मशिदित पोथी वाचून शुध्दीकरण करतो असे सांगितले. परंतू खूप वेळ गेला तरी, काझीने दागिने परत दिले नाहीत. उलट परस्पर बँकेत ते गहाण ठेवून त्यांची लाखोंची आर्थिक फसवणूक केल्याचे समोर आल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular