29.4 C
Ratnagiri
Sunday, November 23, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeMaharashtraअर्थसंकल्पीय अधिवेशनात एसटी संदर्भात मोठा निर्णय होण्याची शक्यता

अर्थसंकल्पीय अधिवेशनात एसटी संदर्भात मोठा निर्णय होण्याची शक्यता

चार महिन्यांपासून सुरु असलेला एसटी संप लवकरच मिटण्याची शक्यता असल्याचं म्हटल जात आहे.

एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण व्हावे या मागणीसाठी मागील साधारण ४ महिन्यांपासून अजूनही कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे.  विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलना संदर्भात सरकारला समिती स्थापन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे या संपावर आणि कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी वेगवान हालचाली सुरु झाल्या आहेत.

तसेच आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करण्याच्या सूचनाही सभापतींनी दिल्या आहेत. तर ज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी याबाबत आपण चर्चेसाठी समिती स्थापन करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.  कारण पगारवाढीचा निर्णय घेतल्यानंतरही विलिनिकरणाची मागणी लावून धरत एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरु ठेवले आहे. यामुळे कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करण्याच्या सूचना सभापतींनी दिल्या आहेत

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचं विलिनीकरणाच्या मागणीसाठी सुरु असलेले आंदोलन अजूनही सुरूच आहे. आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात एसटी संदर्भात मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. काल एस टी महामंडळासंदर्भात परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनामध्ये बैठक घेतली गेली. या बैठकीमध्ये बऱ्याच प्रमणात सकारात्मक चर्चा आणि कर्मचाऱ्यांच्या केलेल्या मागण्यापैकी विविध मागण्या मान्य केल्या असून, ज्या शक्य होत्या त्या सर्व मागण्या मान्य केल्या असून, ज्या अखत्यारीत नाहीत त्यासाठी सुद्धा प्रयत्न सुरु असल्याची माहिती देण्यात आली असून, चार महिन्यांपासून सुरु असलेला एसटी संप लवकरच मिटण्याची शक्यता असल्याचं म्हटल जात आहे. या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्यात आली या बैठकीला गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत, शेकापचे जयंत पाटील, प्रविण दरेकर शेखर चन्ने बैठकीला उपस्थित होते. सकाळी १० वाजता विधानपरिषद सभापती बैठकीतून निघालेल्या तोडग्याबाबत सभागृहात माहिती देण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular