27.2 C
Ratnagiri
Friday, July 4, 2025

विजयदुर्ग’ वर पूल बांधून दोन जिल्हे जोडा…

तालुक्यातील कुंभवडे व सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी...

दाभोळ बंदराचा विकास करा – आ. शेखर निकम

दाभोळ ते पेढे हा जलमार्ग क्र. २८...

मोकाट गुरांचा दिवसाचा खर्च १० हजार – पालिकेला भुर्दंड

शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिकेने हाती...
HomeRatnagiriपरटवणे परिसरात जुगार अड्ड्यावर धाड, ६ जण पोलिसांच्या ताब्यात

परटवणे परिसरात जुगार अड्ड्यावर धाड, ६ जण पोलिसांच्या ताब्यात

या अड्ड्यावर एका आंब्याच्या झाडाखाली बैठक घालून जुगार खेळत असल्याची खबर शहर पोलीस ठाण्याच्या गुप्तवार्ता विभागाला मिळाली.

रत्नागिरीमध्ये गेले काही दिवसांपासून परटवणे परिसरामध्ये जुगार खेळणे मोठ्या प्रमाणात सुरू झाले होते. जवळीलच एका आंब्याच्या बागेत दररोज जुगार अड्डा सुरू झाल्याने परिसरातील काही तरुण जुगार खेळण्यासाठी त्या ठिकाणी जात होते. काही तरुणांना या जुगाराची लत लागल्याने तिथे मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली होती.

पोलीस यावर लक्ष ठेवून संधीची वाट बघत होते. काल परटवणे परिसरात जुगार अड्ड्यावर धाड टाकून पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या सहा जणांना रंगेहाथ पकडले. या कारवाईत घटनास्थळावरून पोलिसांनी रोख आणि काही ७ हजार ४३० रुपयांचा ऐवज हस्तगत केला असल्याची माहिती देण्यात आली असून, या प्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

परटवणे बोरकरवाडी परिसरात फिनोलेक्स गेस्ट हाऊसच्या मागील बाजूस एका आंब्याच्या झाडाखाली हा जुगार अड्डा सुरू झाला होता. या जुगार अड्डयाविरोधात वारंवार तक्रारी झाल्या मात्र पोलीसांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. आठ दिवसांपूर्वीच या ठिकाणी अशीच कारवाई झाल्याची माहिती पुढे आली. परंतु ही कारवाई कागदावर आली नाही ते प्रकारान मिटविण्यात आले.

रविवारी दुपारपासून काही तरुण या अड्ड्यावर एका आंब्याच्या झाडाखाली बैठक घालून जुगार खेळत असल्याची खबर शहर पोलीस ठाण्याच्या गुप्तवार्ता विभागाला मिळाली. ही माहिती मिळताच पोलीस हेड कॉन्स्टेबल महेश कुबडे, पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र फुटक हे अन्य एका सहकाऱ्याला सोबत घेऊन त्या परिसरात दाखल झाले. या ठिकाणी दोन पंच बोलवण्यात आले होते. या पंचांना कारवाई का केली जात आहे, त्याची माहिती देण्यात आली आणि त्यानंतर रीतसरपणे शहर पोलीस स्थानकाच्या गुप्तवार्ता विभागाने परटवणे येथील जुगार अड्ड्यावर धाड टाकली. पोलिसांची धाड पडताच जुगार खेळणाऱ्या तरुणांनी तेथून निसटण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी सहा जणांना रंगेहाथ पकडले तर दोन तरुण घटनास्थळावरून पळून गेले.

RELATED ARTICLES

Most Popular