27.3 C
Ratnagiri
Tuesday, August 5, 2025

अकरावी प्रवेशाचा ऑनलाईन गोंधळ सुरूच विद्यार्थ्यांसह पालक धास्तावले

ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील गोंधळामुळे अकरावीमध्ये प्रवेश घेणाऱ्या...

कोकणनगरमध्ये ३१ हजारांचा गांजा जप्त…

शहरातील कोकणनगर ते प्रशांतनगर येथे पोलिस गस्त...

वाशिष्ठीत पतीचा मृतदेह सापडला, आत्महत्येचे कारण अस्पष्ट

वाशिष्ठी नदीत उडी घेतलेल्या दांपत्यामधील नीलेश अहिरे...
HomeRajapurजामदा प्रकल्पाच्या रखडलेल्या पुनर्वसनाबाबत मंत्रालयात विशेष बैठक, आम. साळवींच्या प्रयत्नांना यश

जामदा प्रकल्पाच्या रखडलेल्या पुनर्वसनाबाबत मंत्रालयात विशेष बैठक, आम. साळवींच्या प्रयत्नांना यश

काजिर्डा येथे जामदा प्रकल्पाचे काम स्थानिक जनतेला विश्वासात न घेता त्यांच्या जमिनीमध्ये सुरु असल्याने प्रकल्पाविरोधात वातावरण पसरले आहे.

जामदा प्रकल्पग्रस्त उपोषणकर्त्यांकडून काजिर्डा येथे मागील ५ दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. राजापूरचे लोकप्रिय आमदार राजन साळवी हे या उपोषणकर्त्याना न्याय मिळवून देण्यासाठी धडपड करताना दिसत आहेत. अखेर त्याची दखल राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी घेतली असून, त्यांनी अधिवेशन संपताच जामदा प्रकल्पाच्या रखडलेल्या पुनर्वसनाबाबत बैठक मंत्रालयात आयोजित करू, असे आश्वासन आमदार राजन साळवी यांना दिले, अशी माहिती आमदार साळवी यांच्या कार्यालयीन सूत्रांकडून देण्यात आली.

शिवसेना पदाधिकार्‍यांकडून मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाची माहिती उपोषणकर्त्यांना देण्यात आली. त्यामुळे जामदा प्रकल्पग्रस्त उपोषणकर्त्यांकडून  काजिर्डा येथे पाच दिवसांपासून सुरु असलेले उपोषण स्थगित केले. काही वर्षांपासून तालुक्याच्या पूर्व परिसरात काजिर्डा येथे जामदा प्रकल्पाचे काम स्थानिक जनतेला विश्वासात न घेता त्यांच्या जमिनीमध्ये सुरु असल्याने प्रकल्पाविरोधात वातावरण पसरले आहे.

प्रकल्पाचे काम पुन्हा सुरू झाल्याने संतप्त प्रकल्पग्रस्तांनी काजिर्डा या प्रकल्पस्थळी ठिय्या मांडून उपोषण सुरु केले होते. दरम्यान, आमदार राजन साळवी यांनी राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची मुंबईत भेट घेऊन जामदाच्या पुनर्वसनाबाबत त्यांच्या दालनात सुरु असलेल्या अधिवेशन काळात एक संयुक्त बैठक आयोजित करावी, अशा मागणीचे निवेदन दिले होते.

त्याची ताबडतोब दखल जलसंपदामंत्र्यांनी घेतली. आणि राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपताच जामदा प्रकल्पाबाबत खास बैठक आयोजित करण्याचे आश्वासन जयंत पाटील यांनी दिले. लेखी आश्वासनाची माहिती दिल्यानंतर उपोषणकर्त्यांनी अखेर उपोषण मागे घेतले. क्रियाशील आमदार राजन साळवी यांच्या प्रयत्नांना अखेत यश मिळाले असल्याने एक प्रकारचे समाधान उपोषणकर्त्यांनी सुद्धा व्यक्त केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular