29.5 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRatnagiriरत्नागिरी जिल्हा परिषद प्रशासकीय इमारत भूमीपूजन सोहळा दिमाखात संपन्न

रत्नागिरी जिल्हा परिषद प्रशासकीय इमारत भूमीपूजन सोहळा दिमाखात संपन्न

रत्नागिरी व सिंधूदुर्ग जिल्ह्यांच्या विकासासाठी ३०० कोटी रुपयांची सिंधूरत्न योजना सुरू करण्यात येणार असून या माध्यमातून तीन वर्षे रत्नागिरी जिल्ह्याला दरवर्षी ५० कोटी रुपये विशेष निधी मिळणार आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून आज रत्नागिरीच्या जिल्हा परिषद प्रशासकीय इमारतीच्या विस्तारीकरण बांधकामाचा भूमीपूजन सोहळा करण्यात आला. या कार्यक्रमावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, रत्नागिरी व सिंधूदुर्ग जिल्ह्यांच्या विकासासाठी ३०० कोटी रुपयांची सिंधूरत्न योजना सुरू करण्यात येणार असून या माध्यमातून तीन वर्षे रत्नागिरी जिल्ह्याला दरवर्षी ५० कोटी रुपये विशेष निधी मिळणार आहे. या माध्यमातून कोकणातील नैसर्गिक संपत्तीचा विकास करण्यात येईल. तसेच पर्यटन, मत्स्य संवर्धन, स्थानिकांना रोजगार आणि वैयक्तिक लाभाच्या योजनाही राबविण्यात येणार आहेत असे त्यांनी सांगितले.

रत्नागिरी ते गणपतीपुळे सागरी मार्गावर जेटबोट सुरु करण्याची माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली. जेणेकरून गणपतीपुळे अंतर कमी होऊन जलप्रवास आनंददायी होईल. त्याचप्रमाणे संगमेश्वरमधील छत्रपती संभाजी महाराज स्मारक सुशोभिकरणासाठी दीड कोटीच्या निधीची घोषणा त्यांनी केली आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, जिल्हा परिषदेच्या या विस्तारीत इमारतीचा आराखडा चांगला केला आहे. जिल्हा परिषदेची ही इमारत ठरलेल्या कालावधीतच पूर्ण झाली पाहिजे व त्याचा दर्जा उत्कृष्ट असला पाहिजे. ही इमारत रत्नागिरी शहराच्या सौंदर्यात भर घालणारी असली पाहिजे, याकडे लोकप्रतिनिधींनी विशेष लक्ष केंद्रित करावे असे त्यांनी आवर्जून सांगितले.

अद्ययावत यंत्रणाचा वापर करून बनविण्यात येणार असलेली ग्रीन बिल्डिंग,  सौर ऊर्जा आदींचा यात समावेश करण्यात आला आहे. प्रत्येक शासकीय वास्तू देखणी, आकर्षक, शहराचे सौंदर्य वाढविणारी असेल, याची काळजी आम्ही घेत असतो. इमारतीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना काम करताना उत्साह वाटला पाहिजे तसेच कामासाठी येणाऱ्या ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधीनाही इमारतीत आल्यावर फ्रेश वाटले पाहिजे.

या कार्यक्रमाच्यावेळी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी बी.एन. पाटील, पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विक्रांत जाधव, आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर आदी उपस्थित होते. तर रत्नागिरीचे पालकमंत्री ॲड. अनिल परब, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular