26.2 C
Ratnagiri
Sunday, August 3, 2025

मुहूर्ताच्या दिवशी पावसाचा खोडा केवळ २० टक्के नौका समुद्रात

शुक्रवारपासून मासेमारीवरील बंदी उठल्यानंतर पहिल्याच दिवशी स्थानिक...

“आम तो आम और गुटली का भी दाम” असा हा प्रकल्प : अनिकेत सुर्वे

"आता वाटद दशक्रोशीतील युवकांनी निर्धार केला आहे,...

स्मार्ट वीजमीटरचा निर्णय रद्द करायला लावू – लियाकत शाह

स्मार्ट वीजमीटर बसवल्यानंतर वाढीव वीजबिले येत असल्याच्या...
HomeRatnagiriसंगमेश्वर फुणगूस प्रसिद्ध दर्गाचा वार्षिक उरुस १६ मार्चपासून सुरू

संगमेश्वर फुणगूस प्रसिद्ध दर्गाचा वार्षिक उरुस १६ मार्चपासून सुरू

संगमेश्वर तालुक्यातील फुणगूस येथील हजरत शेख जाहीर शेख पीर बाबा या दर्गाचा वार्षिक उरुस १६ मार्चपासून सुरू होणार असून पुढे ३ दिवस वेगवेगळे कार्यक्रम होणार आहेत.

संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या संगमेश्वर तालुक्यातील फुणगूस येथील हजरत शेख जाहीर शेख पीर बाबा या दर्गाचा वार्षिक उरुस १६ मार्चपासून सुरू होणार असून पुढे ३ दिवस वेगवेगळे कार्यक्रम होणार आहेत.

फुणगुस येथील दर्गा निसर्गाच्या सान्निध्यात खाडीकिनारी असा आहे. येथील काचेची कलाकृती व सजावट नेहमीच आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहे. दरवर्षी हजारो भाविक येथे भेट देतात. पर्यटकांन देखील या दर्गाचे सौंदर्य आणि परिसर आकर्षित करू लागला आहे. येथील वार्षिक उरुस तर भाविकांना नेहमीच एक पर्वणी ठरतो. त्यामुळे उत्सव काळात हजारो भाविक येथे येतात. त्यामुळे तीन दिवस परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त होते.

बुधवार १६  मार्च रोजी चुना मुबारकने उरुसाची सुरुवात होणार असून दि. १७ मार्च रोजी दुपारी दर्गा व्यवस्थापक नूरमहंमद मुजावर, सह व्यवस्थापक मुसववीर मुजावर यांच्या निवासस्थानातून संदल मुबारकची मिरवणूक निघणार आहे. सायंकाळी या मिरवणुकीचा समारोप होणार आहे. तसेच रात्री १० वाजता दर्गा परिसरात नुराणी मैफील फुणगूस यांचा रातीब (मस्तान)चा कार्यक्रम होणार आहे.

मुसववीर मुजावर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. शुक्रवार दि. १८  मार्च रोजी पारंपरिक पद्धतीने उरुस उत्सव साजरा होणार आहे. रात्री संदल मुबारकची मिरवणूक निघेल. फुणगूस मोहल्ला तसेच बाजारपेठमार्गे ही मिरवणूक रात्री दर्गा येथे दाखल होईल आणि मजार शरीफवर गिलाफ व संदल सादर केला जाईल. या उरुसाला हिंदू आणि मुस्लीम धर्माचे बांधव नवस फेडण्यासाठी उपस्थित राहतात. इथे मागितलेली प्रत्येक गोष्ट पूर्ण होतेच अशी भाविकांची श्रद्धा आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात या उरुसाला गर्दी असते.

RELATED ARTICLES

Most Popular