28.8 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

७२ तासानंतर महिलेचा मृतदेह सापडला, चर्चाना फुटलंय पेव

तब्बल ७२ तासांच्या प्रयत्नानंतर अखेर अश्विनी अहिरेचा...

तटरक्षक दलाचा टिळक रुग्णालयाबरोबर करार

भारतीय तटरक्षक दल हे संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारित...

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...
HomeChiplunआ. शेखर निकम यांच्या प्रयत्नाना यश, अर्थसंकल्पात भरघोस निधी

आ. शेखर निकम यांच्या प्रयत्नाना यश, अर्थसंकल्पात भरघोस निधी

ठराविक कामासाठी पुरेसा निधी उपलब्ध झाल्याने जनतेसह सर्वमध्ये समाधान व्यक्त होत आहे

चिपळूण व संगमेश्वर तालुक्यातील अनेक विकास कामे आता आ. शेखर निकम यांच्या प्रयत्नाने मार्गी लागत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पात संगमेश्वर तालुक्यासाठी १२ कोटी ३४  लाख तर, चिपळूण-संगमेश्वर मतदार संघासाठी ३८ कोटी रुपये विकासनिधी मंजूर झाला आहे. ठराविक कामासाठी पुरेसा निधी उपलब्ध झाल्याने जनतेसह सर्वमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

संगमेश्वर तालुक्यातील आरवली मुरडव कुंभारखाणी बुद्रुक कुचांबे, पांचाबे, राजीवली, रातांबी येडगेवाडी गायकवाडवाडी रस्ता व मोठ्या पुलांची पुनर्बांधणी करणेसाठी ४ कोटी ६५ लाख ५० हजार, आरवली माखजन-करजुवे डिंगणी संगमेश्वर रस्ता डांबरीकरण करणेसाठी १ कोटी ४२  लाख, देवरुख हरपुडे बेलारी कुंडी ते जिल्हा सिमेपर्यंत बेलारी शाखेसह रस्ता करण्यासाठी २  कोटी २८  लाख निधी मंजूर झाला आहे.

त्यांनतर  माखजन करजुवे डिंगणी संगमेश्वर रस्ता पुलांची पुनर्बांधणी करणेसाठी १ कोटी,  पोचरी परचुरी कुरधुंडा कोळंबे नांदळज कोसुंब बोरसुत कुळ्ये लहान पुलांची पुनर्बांधणी करणेसाठी १ कोटी १४  लाख, परचुरी कुरधुंडा कोळंबे नांदळज कोसुंब बोरसुत कुळ्ये फणसवळे रस्ता पुलांची पुनर्बांधणी करणेसाठी १ कोटी १४ लाख इतका निधी मंजूर झाला आहे.

तर मतदारसंघात चिपळूण तालुक्यासाठी १३ कोटी ९७ लाख ९० हजार मंजूर करण्यात आले आहेत. चिपळूण तालुक्यातील असुर्डे कुटरे राजीवली रस्ता करणेसाठी २  कोटी ८५  लाख,  पिंपळी नांदिवसे रस्ता  डांबरीकरण करणे ५७  लाख,  कुटरे राजीवली रस्ता डांबरीकरण करणे २ कोटी ८५ लाख तर कुटरे-राजिवली रस्ता पुलाची पुनर्बांधणी करणेसाठी १ कोटी १४ लाख,  सावर्डा दुर्गवाडी तळवडे रस्ता पुलाची पुनर्बांधणी करणसाठी १ कोटी ४२ लाख, पेढांबे अलोरे रस्ता डांबरीकरण करणेसाठी ६८ लाख ४० हजार मंजूर झाले आहेत. या भरघोस निधीमुळे ही कामांना आता वेग प्राप्त होणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular