26.4 C
Ratnagiri
Thursday, December 26, 2024
HomeMaharashtraखासदार विनायक राऊत यांनी “त्या” वक्तव्याबद्दल मागितली माफी

खासदार विनायक राऊत यांनी “त्या” वक्तव्याबद्दल मागितली माफी

'शेंडी-जानव्याचे हिंदुत्व आम्हाला मान्य नाही' असे वादग्रस्त वक्तव्य विनायक राऊत यांनी केल्याने ब्राह्मण समाज समन्वय समितीने त्यावर आक्षेप नोंदवला होता.

शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी औरंगाबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ब्राह्मण समाजाला लक्ष करत केलेल्या भाष्यामुळे वाद निर्माण झाले आहेत. त्यामुळे राज्यातील ब्राह्मण संघटना आक्रमक झाल्या आहेत. एकतर विनायक राऊतांनी बिनशर्त माफी मागावी, अन्यथा त्यांचा दशक्रिया विधी करण्यात येईल, असा इशारा ब्राह्मण सेवा संघाने दिला होता. यानंतर विनायक राऊत यांनी प्रत्यक्ष भेटून ब्राम्हण समाजाची जाहीर माफी मागितली.

‘शेंडी-जानव्याचे हिंदुत्व आम्हाला मान्य नाही’ असे वादग्रस्त वक्तव्य विनायक राऊत यांनी केल्याने ब्राह्मण समाज समन्वय समितीने त्यावर आक्षेप नोंदवला होता. या पाश्वभूमीवर खासदार राऊत यांनी आज औरंगाबादमध्ये ब्राह्मण समाजाची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी आपन नकळत केलेल्या  वक्तव्याबद्दल माफी मागितली. काही कळत नकळत माझ्या तोंडून उद्गार निघाले, त्यामध्ये कोणाचाही अनादर करण्याचा माझा उद्देश नव्हता. म्हणून मी आज नतमस्तक होऊन माफी मागायला आलो आहे. ब्राह्मण समाजाची माफी मागून त्यांनी कृपा आशीर्वाद कायम ठेवावा असे म्हटले आहे. काही चूक झाली असेल तर माफ करा असंही पुढे म्हटलं.

राज्यातून या वक्तव्याचा अनेक ठिकाणाहून निषेध करण्यात आला. शिवसेना पक्षातर्फे व शिवसेनेच्या नेत्यांतर्फे असा उल्लेख करण्याची ही पहिलीच वेळ नाही आहे. याआधीही महाराष्ट्राच्या विधानसभेत जाहीर सभेत, पत्रकार परिषदेमध्ये अनेकदा अशी वादग्रस्त वक्तव्य शिवसेनेच्या नेत्यांतर्फे करण्यात आली आहेत. २०२४ ला लोकसभा निवडणुकीत खासदार, शिवसेना सचिव विनायक राऊत यांना ब्राह्मण समाज काय आहे हे दाखवून देऊ, असा थेट इशाराच भारतीय जनता युवा मोर्चाचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांनी दिला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular