23.1 C
Ratnagiri
Sunday, December 22, 2024

मोदींनी जनतेचा खिसा कापला, पॉपकॉर्नपासून जुन्या कारपर्यंत जीएसटी वाढला

आधीच महागाईत होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देण्याऐवजी मोदी...

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाला ८५ ‘एमबीबीएस’ डॉक्टर

जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदाचा आणि...

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी पुढाकार, गडकिल्ले संवर्धन

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या...
HomeSindhudurgताबा सुटल्याने चिरे वाहतूक करणारा डंपर १०० फुट दरीत कोसळला

ताबा सुटल्याने चिरे वाहतूक करणारा डंपर १०० फुट दरीत कोसळला

समोरून येणाऱ्या एका गाडीचा अंदाज न आल्याने त्यांचा गाडीवरील ताबा सुटला आणि त्यांची गाडी थेट शंभर फूट खोल दरीत कोसळली.

महामार्गावर आणि घाट भागामध्ये अवजड वाहतूक सुरु करण्यात आल्याने काही वेळेला चालकाच्या एका नजर चुकीने मोठे अपघात होण्याची शक्यात असते. त्यामुळे चालकाचे संपूर्ण लक्ष त्याच्या वाहन चालविण्याकडे असणे गरजेचे आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली घाटात चिरे वाहतूक करणारा डंपर कोसळण्याची घटना घडली आहे मात्र या अपघातातून डंपरचालक सुदैवाने बचावला आहे. पहाटेच्या वेळी चिरेवाहतूक करणारा डंपर कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने चालकाने प्रसंगावधान साधत गाडी बाहेर उडी टाकल्यामुळे मोठा अनर्थ टळला. यात डंपरचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शब्बीर शेख रा.माणगाव असे त्या चालकाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शेख हे आपल्या ताब्यातील डंपर घेऊन चंदगडच्या दिशेने चिरे वाहतूक करत होते. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घाटातून जात असताना त्यांच्या समोरून येणाऱ्या एका गाडीचा अंदाज न आल्याने त्यांचा गाडीवरील ताबा सुटला आणि त्यांची गाडी थेट शंभर फूट खोल दरीत कोसळली. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तात्काळ गाडी बाहेर उडी घेतली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला अपघातात वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अपघाताची खबर मिळताच आंबोली दूरक्षेत्राचे हवालदार, देसाई यांच्यासह त्यांच्या ३ सहकाऱ्यांनी देखील घटनास्थळी दाखल होऊन दरीमध्ये उतरून गाडीमध्ये कोणी अडकले नाही आहे ना याची खातरजमा करून घेतली. कारण डंपरवरचा ताबा सुटून तो थेट शंभर फुट खोल दरीमध्ये कोसळल्याने कोणी जगण्या वाचण्याची आशाच शिल्लक राहिली नव्हती. चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधाने स्वत:चा जीव वाचविण्यात याला यश मिळाले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular