अनेक शाळांमध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या तक्रारीबद्दल बहुतकरून शासकीय शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री गायकवाड यांनी दिली आहे. ज्या शाळेत विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. अशा शाळांमध्ये सर्वप्रथम सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.
राज्यातील शासकीय शाळेच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात येत असून, त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शासकीय शाळेत वर्षभरात टप्प्या टप्प्याने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे. राज्यात एकूण ६५ हजार जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत, त्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येतील, असे वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे. नुसतेच सीसीटीव्ही कॅमेरे बसवून चालणार नसून त्याची ठराविक कालावधीनंतर व्यवस्थित देखभाल होण्याची देखील गरज असल्याचे देखील वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.
राज्य सरकारचे जास्त संख्या असणाऱ्या शाळानुसार, येत्या वर्षाभरात शाळांचा प्राधान्य क्रम ठरवून हे काम पूर्ण केले जाईल. तसेस ज्या खासगी शाळा आहेत त्यांना देखील सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या सूचना देण्यात येतील असे देखील सूचक वक्तव्य त्यांनी यावेळी केलं आहे.
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केलेल्या महत्त्वपूर्ण घोषणेच सर्व स्तरातून स्वागत केले जात आहेत. प्रत्येक शाळेमध्ये सीटीव्ही कॅमेरा बसवल्यास विद्यार्थ्यांच्या सुरक्षेमध्ये वाढ होणार आहे. तसेच अनेक वेळा घडणारे गैरप्रकार समोर आल्याने पुन्हा तसले प्रकार घडण्याच्या प्रमाणाला आळा बसणार आहे. येत्या वर्षभरात राज्यातील सर्वच शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.