भारतीय विमान प्राधिकरणामध्ये (Airports Authority of India, AAI) विविध पदांची भरती केली जाणार आहे. एअरपोर्ट अथॉरीटी ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भात नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
एअरपोर्ट अथॉरीटी ऑफ इंडियाच्या भूमि प्रबंधन आणि अग्निशमन विभागामध्ये कन्सल्टंट आणि ज्युनिअर कन्सल्टंटची १२ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइट www.aai.aero वर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा लागेल.
या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. २८ आणि २९ एप्रिल ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
कंसल्टंट या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना १ लाख रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. या पदासाठी २९ एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार आहे. तर ज्युनिअर कन्सल्टंट पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना ५० हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. या पदासाठी २८ एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार आहे.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी वेबसाईटवर जाऊन सूचना आणि पीडीएफ काळजीपूर्वक वाचावी. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास, अपूर्ण असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
पूर्ण नोटिफिकेशन खालील लिंकवर उपलब्ध
- कन्सल्टंट पदाचे नोटिफिकेशन पाहण्यासाठी येथे क्लिक करा
- ज्युनिअर कन्सल्टंट पदाचे नोटिफिकेशन पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी. सर्व मराठी मुलांना वरील जाहिरात पाठवावी जेणेकरून आपल्या मराठी मुलांना चांगली संधी मिळेल.