30.4 C
Ratnagiri
Saturday, May 10, 2025

परशुराम घाटात पाण्यासाठी धबधब्याची रचना…

पावसाळ्यात वाहतुकीसाठी धोकादायक ठरणाऱ्या परशुराम घाटात गॅबियन...

जिल्हा रुग्णालयातील ‘पोलिस चौकी’ अदृश्य…

रुग्ण, अपघातग्रस्तानांना तातडीची मदत जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय...

‘साथी’मुळे बनावट बियाणे विक्रीस पायबंद फसवणुकीला आळा

बनावट, कालबाह्य आणि अनधिकृत बियाण्यांच्या विक्रीस पायबंद...
HomeMaharashtraराज ठाकरेंच्या भाषणातून, अनेकांना प्रत्युत्तर

राज ठाकरेंच्या भाषणातून, अनेकांना प्रत्युत्तर

जर मशिदींवरचे भोंगे उतरवले नाही तर, हनुमान चालीसा लावणारचं असे देखील राज ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.

आज झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केलेली. संजय राऊत शिवसेनेचे आहेत की, राष्ट्रवादीचे हेच कळत नाही असे म्हणत आपल्याला ईडीची पुन्हा नोटीस आली तर, सामोरं जाईन, असे त्यांनी यावेळी सांगितले. देशामध्ये अनेक वर्षांपासून जाती आहेत. मात्र,  राज ठाकरे यांनी १९९९ला राष्ट्रवादीचा जन्म झाल्यानंतर दुसऱ्या जातीं बद्दल द्वेष निर्माण करायला लावल्याचे म्हटले आहे.

संभाजी ब्रिग्रेडसारख्या संघटना यांनीच तयार केल्या असे म्हणत राष्ट्रवादीच्या जन्मानंतरच राज्यात जातीयवाद वाढल्याचा हल्लाबोल राज ठाकरे यांनी केला. शरद पवार कधीही शिवाजी महाराजांचं नाव घेत नाहीत ते भाषण करताना नेहमी तेव्हा शाहू, फुले, आंबेडकरांचे नाव घेतात. शरद पवार स्वत: नास्तिक आहेत. त्यामुळे धर्माकडे बघताना ते नास्तिकतेनं बघतात. ते धर्म, देव वगैरे काही मानत नाहीत. मग ते त्यांच्या पद्धतीने राजकारण समजावण्याचा प्रयत्न करतात.

देशातील आणि राज्यातील मशिदींवरील सर्व भोंगे ३ मे पर्यंत उतरवा, आम्ही आमची भूमिका मागे घेणार नाही, असे सांगत त्यांनी राज्य सरकारला अल्टिमेटम दिला आहे. जर मशिदींवरचे भोंगे उतरवले नाही तर, हनुमान चालीसा लावणारचं असे देखील राज ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले. ३ तारखेला ईद आहे. माझी राज्य सरकारला, गृहखात्याला विनंती आहे की, कुठलीही तेढ, दंगल निर्माण करायची नाहीये. आम्हाला त्याची इच्छा देखील नाही. त्यामुळे राज्य सरकारने १२ एप्रिल ते ३ मे, महाराष्ट्रातल्या सगळ्या मशिदींमधल्या मौलवींशी चर्चा करावी आणि त्यांना सगळे भोंगे खाली उतरवण्यास सांगावे.

राज ठाकरे यांनी भाषणा दरम्यान आपण देशात समान नागरी कायदा आणण्याची विनंती केली आहे. ते म्हणाले की, देशातील लोकसंख्येवर नियंत्रण आणता येईल, असा कायदा आणा असे आवाहन नरेंद्र मोदींना केले आहे. लोकसंख्येवर नियंत्रण आणले पाहिजे असे ते म्हणाले.

RELATED ARTICLES

Most Popular