कालपासून सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये दाखल केल्याचे वृत्त अनेक माध्यमांवर प्रसिद्ध होत आहे. तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली ते उपचार घेत आहेत. धनंजय मुंडे यांची प्रकृती आता चांगली असून सतत प्रवास आणि दगदग यातून त्यांना भोवळ येऊन शुद्ध हरपली व त्यानंतर तातडीने त्यांना ब्रीच कँडी मध्ये दाखल करण्यात आले.
राजकारणात कितीही कटुता आली तरीही प्रत्यक्षात नाती ही महत्वाची असतात. प्रत्येक सुख-दुःखात राजकीय वैर बाजूला ठेवून अनेक जण जवळ येत असल्याची उदाहरणं आपण पाहत असतो. महाराष्ट्राच्या राजकारणात देखील अशी अनेक उदाहरणं आपण पाहिली आहे. अनेक कुटुंब राजकारणात सक्रीय असून, वेगवेगळ्या पक्षांतर्गत कार्यरत आहेत परंतु, मुंडे बंधू भगिनींच्या बाबतही आपण हे पाहिलं आहे. आजही भाऊ दवाखान्यात ॲडमिट झाल्याची माहिती कळताच पंकजा आणि प्रीतम या दोन्ही बहिणी त्यांना पाहायला धावून आल्या.
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे प्रकृती अस्वाथ्यामुळं दवाखान्यात भर्ती आहेत. त्यांना भेटायला भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे पोहोचल्या. त्यांनी धनंजय मुंडेंची बराच वेळ भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली. भावाची भेट घेतल्यानंतर पंकजा मुंडे म्हणाल्या की, धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा झटका आला ही चुकीची बातमी आहे. त्यांना भोवळ आली होती. त्यांची प्रकृती स्थिर आहे. विकनेस आला होता. आता त्यांचे सर्व रिपोर्ट नॉर्मल आहेत. आता ते व्यवस्थित आहेत. आम्ही त्यांना भेटलो आणि बोललो, ते रिकव्हर होत आहेत, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.