संपूर्ण दिवसाचा सर्वात महत्त्वाचा भाग सकाळची दिनचर्या हा असतो. सकाळी उठल्यानंतर लगेच जे काही खाल्ल किंवा प्यायल जाते केवळ त्याचाच परिणाम शरीरावर दिवसभर होत राहतो. त्यामुळे जर काही आरोग्यदायी खाल्ले किंवा प्यायले, तर दिवसभर त्याचा उत्साह आणि टवटवीतपणा राहील आणि काहीही अनहेल्दी खाल्ल्याने थकवा किंवा अशक्तपणा जाणवण्याची शक्यता आहे.
अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी आरोग्य चांगले राहण्यासाठी काय खातात, पितात याबद्दल आपण जाणून घ्यायला उत्सुक असतोच. अनेक सेलिब्रिटीनी आपली काही सिक्रेट पेये येथे सांगितली आहेत. जे तुमचे मॉर्निंग रूटीन आणखी सुंदर बनवतील.
शिल्पा शेट्टी चित्रपटसृष्टीतील सर्वात फिट अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. वयाच्या ४६ व्या वर्षीही तीने योगाभ्यास आणि सकस आहाराने स्वतःला स्लिमट्रीम ठेवले आहे. तिचे सकाळचे आवडते पेय म्हणजे CCF. हे पेय ती उठल्यानंतर प्रथम पिते. CCF ला Carom-Cumin-Fennel ड्रिंक असेही म्हणतात. याला मराठीत ओवा, जिरे आणि बडीशेपचं पाणी असं म्हणतात.
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या टोन्ड फिगरसाठी प्रसिद्ध आहे. ती अनेकदा तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचा डाएट आणि एक्सरसाइज रूटीन शेअर करत असते. ती मॉर्निंग कॉकटेल सकाळी घेते. त्यामध्ये आले, हळद आणि अॅप्पल सायडर व्हिनेगरचा समावेश असतो.
सोनम कपूर तिच्या दिवसाची सुरुवात कोमट पाण्यात मध आणि लिंबू मिसळून करते. सोनम कपूर ही फिटनेस अॅडिक्ट आहे. सध्या गर्भवती असली तरी ती तिच्या डाएटचा पूर्ण विचार करून फॉलो करते.
कियाराचे सकाळचे आवडते पेय हळदीचे पाणी आहे. हळद ही त्याच्या अँटीबैक्टीरियल गुणधर्मांसाठी ओळखली जाते. एका ग्लास कोमट पाण्यात एक चमचा हळद मिसळा आणि रिकाम्या पोटी प्या. हे प्यायल्याने तुमची पचनक्रिया तर चांगली राहतेच पण मजबूत रोगप्रतिकारक शक्तीसाठीही हे खूप फायदेशीर आहे.
नॅशनल क्रश रश्मिका मंदाना आपला दिवस निरोगी पेयाने सुरू करते. ती सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास अॅप्पल सायडर व्हिनेगर पिते. हे केवळ शरीरातील विषारी पदार्थच बाहेर टाकत नाही तर त्वचेचे आरोग्य देखील सुधारते. अशा प्रकारे सेलिब्रिटी आपल्या बिझी शेड्यूलमधून सुद्धा स्वत:साठी वेळ काढतात.