28.5 C
Ratnagiri
Tuesday, July 8, 2025

कोकणच्या समुद्रात पाकिस्तानची बोट, सर्व यंत्रणा सतर्क

कोकणच्या समुद्रात रविवारी रात्री एक संशयास्पद बोट...

जिल्हाधिकारी कार्यालयात गुरांसह बसण्याचा इशारा…

वाटद एमआयडीसीमध्ये कोणते प्रकल्प येणार याबाबत एमआयडीसीची...
HomeDapoliमहसूल विभागाकडून २ वर्षापूर्वी सील केलेली क्रेन गेली चोरीला

महसूल विभागाकडून २ वर्षापूर्वी सील केलेली क्रेन गेली चोरीला

दापोली महसूल विभागाच्या पथकाने २०२० साली पांगारी खाडीकिनारी बेकायदेशीर वाळू उपसा करण्यासाठीच्या उद्देशाने ठेवलेली क्रेन, जप्त करून सील केली होती.

दापोली तालुक्यातील आंजर्ले खाडीत अनके ठिकाणी सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू उपशावर दापोली महसूल विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. दापोली महसूल विभागाच्या पथकाने २०२० साली पांगारी खाडीकिनारी बेकायदेशीर वाळू उपसा करण्यासाठीच्या उद्देशाने ठेवलेली क्रेन, जप्त करून सील केली होती. मात्र, जप्त केलेली ही क्रेन मशिनरी दोन दिवसांपूर्वी रातोरात चोरीला गेल्याची घटना उघड झाली आहे. त्या कारवाईनंतर ही क्रेन लगेचच या ठिकाणाहून चोरीला गेल्यामुळे या क्रेन चोरीमागचे नेमके कारण काय याची चर्चा दापोली तालुक्यात सुरु आहे.

दापोली महसूल विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सुमारे १५ लाख किमतीची ही क्रेन होती, असा अंदाज वर्तविला जात आहे. ज्या वर्षी ही क्रेन मशिनरी सील करण्यात आली. त्यानंतर हि सील केलेली क्रेन दापोली महसूल विभाग कधी ताब्यात घेऊन दापोलीत आणणार अशी वारंवार विचारणा केली असता, त्या वेळेस दापोली तहसीलदार वैशाली पाटील यांनी पत्रकारांना एखाद्या गाडीची व्यवस्था झाली की ती क्रेन दापोलीत आणली जाईल, असे सांगितले होते. मात्र, दोन वर्ष उलटून गेली तरी सुद्धा दापोली महसूल विभागाला हि क्रेन ताब्यात घेण्यास वेळ मिळाला नसल्याने, शेवटी ती क्रेन चोरीला गेल्याचा प्रकार घडून आला.

पांगारी या ठिकाणी बेकायदेशीर वाळू उपसा होत असल्याची तक्रार महसूल विभागाकडे जास्त प्रमाणात येत होत्या. त्यानुसार येथील देगाव मंडळ अधिकारी सुधीर पार्दूले यांनी दि. १ नोव्हेंबर २०२१ रोजी येथे पंचनामा करून वाळू साठा आणि सील तोडलेली उभी क्रेन, अशी पंचयादी घातली होती. मात्र, ही क्रेन चोरीला गेल्याने दापोली महसूल विभागाच्या वेळखाऊ कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular