29 C
Ratnagiri
Saturday, July 12, 2025

मद्यधुंद अवस्थेत असलेल्या कन्या एक्स्प्रेसमध्ये तरुणीचा धिंगाणा, प्रवासी हैराण

कोकण रेल्वेमधील एसी डब्यामध्ये मद्यधुंद अवस्थेत असलेल्या...

दुर्गम भागासाठी हवी स्वतंत्र संचमान्यता – मुख्याध्यापक संघाची मागणी

शासनाच्या १५ मार्च २०२४ च्या संचमान्यता निर्णयामुळे...

वाढत्या समस्यांनी रत्नागिरीकर त्रस्त, शहराच्या दुरवस्थेबाबत भाजप आक्रमक

शहरातील खड्डेमय रस्ते, अनियमित पाणीपुरवठा, गटारांची खराब...
HomeMaharashtraआमच्या महाराष्ट्रात ‘योगी’  कुणीच नाहीत आहेत ते फक्त सत्तेचे ‘भोगी’ –राज ठाकरे

आमच्या महाराष्ट्रात ‘योगी’  कुणीच नाहीत आहेत ते फक्त सत्तेचे ‘भोगी’ –राज ठाकरे

महाराष्ट्र सरकारला सदबुद्धी मिळो, हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना”, असा शब्दांत राज ठाकरेंनी आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

मनसेच्या गुढीपाडव्याच्या सभेत अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदूत्वाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवत मशिदींवरील भोंगे उतरवा अन्यथा मशिदींसमोर मोठ्या आवाजात हनुमान चालीसा वाजवू असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर मनसेनं आक्रमक भूमीका घेत राज्यभरात मशिदींसमोर हनुमान चालीसा लावली. शिवाय भारतीय जनता पक्षानेही उघडपणे राज ठाकरेंच्या या भूमीकेला पाठींबा दिला होता.

उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारच्या निर्देशानंतर मंदिर आणि मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांवर धडक कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या भोंगे उतरवण्याच्या कारवाईनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे विशेष कौतुक केलं आहे. पत्राच्या माध्यमातून राज ठाकरे यांनी योगींचे कौतुक केलं आहे.

राज ठाकरेंच्या केलेल्या या कौतुकानंतर मनसे-भाजपा युतीच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळं येत्या काळात मनसे-भाजपा युती होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांवरील, विशेषत: मशिदींवरील भोंगे उतरवल्या बद्दल योगी सरकारचे मन:पुर्वक अभिनंदन आणि आभार”, असा शब्दांत राज ठाकरे यांनी योगींचे कौतुक केलं आहे.

तसंच, याच पत्राच्या माध्यमातून राज ठाकरेंनी ठाकरे सरकारवर निशाणा साधत म्हटल आहे कि, “आमच्या महाराष्ट्रात ‘योगी’  कुणीच नाहीत आहेत ते फक्त सत्तेचे ‘भोगी’!  महाराष्ट्र सरकारला सदबुद्धी मिळो, हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना”, असा शब्दांत राज ठाकरेंनी आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

तर सत्ताधाऱ्यांकडून राज ठाकरे धार्मिक तेढ निर्माण करत असल्याचा आरोप करत टीका करण्यात येत होती. दरम्यान, राज ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये भोंगे उतरवण्यात आले. त्यानुसार आता महाराष्ट्रातही ठाकरे सरकार भोंगे उतरवणार का?  याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular