28.3 C
Ratnagiri
Wednesday, October 9, 2024

आधी ठेकेदारांकडून पैसे घेणे थांबवावे! पालकमंत्री सामंतांनी लगावला टोला

काहीजण म्हणतात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर मी...

रेल्वे स्थानकांच्या आज लोकार्पण..

राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत जिल्ह्यातील रत्नागिरी,...
HomeEntertainmentभारतीय संस्कृतीचा डंका भारताबाहेर सुद्धा

भारतीय संस्कृतीचा डंका भारताबाहेर सुद्धा

अनेक हॉलिवूड कलाकार सुद्धा भारतीय संस्कृतीला मानतात.

भारतीय धर्म संस्कृती केवळ भारतामध्येच नव्हे तर इतर राष्ट्रांमध्येदेखील भारतीय संस्कृतीचा अवलंब केला जातो. अनेक हॉलिवूड कलाकार सुद्धा भारतीय संस्कृतीला मानतात. हिंदू धर्मातील मंत्र , स्तोत्र, योग, ध्यान या सगळ्यावर त्यांचा विश्वास आहे.

नुकत्याच काही दिवसांपूर्वी विल स्मिथ भारतात आला आहे. त्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर वायरल होत आहे. ज्यामध्ये तो इस्कॉन मंदिरामध्ये पूजा करताना दिसत आहे. याच दरम्यान विल स्मिथने आध्यात्मिक गुरू सदगुरुंची सुद्धा भेट घेतली. परंतु तुम्हाला माहित आहे का, हॉलिवूडमधील फक्त विल स्मिथच नाही तर असे अनेक हॉलिवूड सेलिब्रिटी आहेत, जे हिंदू धर्म मानतात आणि हिंदू धर्म संस्कृतीप्रमाणे आचरण करतात. काहींनी तर हिंदू धर्म देखील स्वीकारला आहे.

याआधी सुद्दा हॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्माबद्दल आपली आस्था दाखवलेली आहे. हॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री जूलिया रॉबर्ट्ससुद्धा हिंदू धर्म मानते. जूलिया रॉबर्ट्स तिचा प्रसिद्ध हॉलिवूड चित्रपट ‘ईट, प्रे, लव’साठी भारतामध्ये शूटिंगसाठी आली होती. त्यावेळी जन्माने ख्रिश्चन असलेल्या जूलियाने जेव्हा बजरंगबली हनुमानाचा फोटो पाहिला, तेव्हा तिने हिंदू धर्म स्विकारायचा निर्णय घेतला. त्यानंतर ती म्हणाली होती की, हिंदू झाल्यापासून तिला खूप छान वाटत आहे.

प्रसिद्ध कॉमेडियन रसल सुद्धा हिंदू धर्म मानतो. शिवाय तो आध्यात्म आणि योग साधना फॉलो करतो. रसलने लग्न देखील राजस्थानमध्ये हिंदू परंपरेनुसार केलं होतं.

हॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सिल्वेस्टर स्टेलॉन यांच्या मुलाचा अपघाती मृत्यू ओढवला होता, तेव्हा त्यांना त्यांच्या आजूबाजूला सतत त्यांच्या मुलाचा भटकता आत्मा दिसून येत होता. त्यानंतर एका पूजाऱ्याने त्यांना भारतीय संस्कृतीप्रमाणे मृतात्म्याचे पिंडदान करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर सिल्वेस्टर स्टेलॉनचे संपूर्ण कुटुंब पिंडदान करण्यासाठी भारतातील हरिद्वारला आले होते. तेव्हापासून सिल्वेस्टर स्टेलॉन हिंदू धर्मावर विश्वास ठेवायाला लागले.

RELATED ARTICLES

Most Popular