32.3 C
Ratnagiri
Wednesday, December 4, 2024

चिपळूण कापसाळ महामार्गावर गव्यांचा मुक्त संचार

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर चिपळूण शहराजवळील कापसाळ येथे...

हापूसचा हंगाम दीड महिन्यानी लांबला…

जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी ढगाळ वातावरण निर्माण...
HomeMaharashtraएमपीएससीद्वारे नोकरीची संधी

एमपीएससीद्वारे नोकरीची संधी

मुंबईतील विविध शासकीय कार्यालयातील लघुटंकलेखक, लघुलेखक पदांसाठी ही भरती होणार आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने म्हणजेच एमपीएससीने नोकरीसाठी  जाहिरात प्रसिद्ध केली आहे. जवळपास २५३ वेगवेगळ्या पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयातील विविध प्रशासकीय विभाग तसेच मुंबईतील विविध शासकीय कार्यालयातील लघुटंकलेखक, लघुलेखक पदांसाठी ही भरती होणार आहे.

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी एमपीएससीची अधिकृत वेबसाईट mpsc.gov.in  ला भेट द्यावी. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया २२ एप्रिलपासून सुरु झाली आहे. १२ मे २०२२ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

पदांचा तपशील –

उच्च श्रेणी लघुलेखक(इंग्रजी), गट ब, अराजपत्रित संवर्ग – एकूण ३० पदे

उच्च श्रेणी लघुलेखक(मराठी), गट ब, अराजपत्रित संवर्ग – एकूण ३२ पदे

लघुटंकलेखक(इंग्रजी), गट क संवर्ग – एकूण ३९ पदे

लघुटंकलेखक(मराठी), गट क संवर्ग – एकूण ५२ पदे

निम्न श्रेणी लघुलेखक(मराठी), गट ब, अराजपत्रित संवर्ग – एकूण ५५ पदे

निम्न श्रेणी लघुलेखक(इंग्रजी), गट ब, अराजपत्रित संवर्ग – एकूण ४५ पदे

अर्ज करण्याची तारीख – २२ एप्रिल २०२२ (दुपारी २ वाजल्यापासून)

अर्ज करण्याची अंतिम तारीख – १२ मे २०२२ (रात्री ११.५९ मिनिटापर्यंत)

शैक्षणिक पात्रता –

दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक. लघुलेखनाची गती १०० शब्द प्रति मिनिट. टायपिंग गती ३० ते ४० शब्द प्रति मिनिट (पदनिहाय शैक्षणिक पात्रता अधिसूचनेत पाहावी)

अर्ज शुल्क –

अराखीव (खुला) – ३९४ रुपये

मागसवर्गीय – २९४ रुपये

RELATED ARTICLES

Most Popular