23.9 C
Ratnagiri
Sunday, December 22, 2024

मोदींनी जनतेचा खिसा कापला, पॉपकॉर्नपासून जुन्या कारपर्यंत जीएसटी वाढला

आधीच महागाईत होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देण्याऐवजी मोदी...

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाला ८५ ‘एमबीबीएस’ डॉक्टर

जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदाचा आणि...

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी पुढाकार, गडकिल्ले संवर्धन

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या...
HomeRatnagiriआंबा चोरीमुळे आंबा बागायतदार हैराण, थेट जिल्हाधिकाऱ्याना निवेदन

आंबा चोरीमुळे आंबा बागायतदार हैराण, थेट जिल्हाधिकाऱ्याना निवेदन

जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांना कोंकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेते सहकारी संस्थेच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले आहे.

आंबा बागायतदारांसाठी आंबा व्यवसाय करणे पूर्वीसारखा सोपा राहिलेला नाही. एकत्र वारंवार बदलणारे  हवामान आणि शासनाकडून अडचणी सोडविण्यासाठी होत असलेली दिरंगाई यामुमुळे मेटाकुटीला आलेल्या आंबा व्यवसायिक आता नव्या समस्येमुळे ग्रासले आहेत. काही ठिकाणी तर बागेच्या रखवालदाराला देखील मारहाण करून आंबा चोरी केली जात आहे. अनेक बागायतदाराना असे अनुभव आले आहेत.

वर्षभर आंब्याच्या बागा, नवनवीन झाडे पोटच्या पोरासारख जपून हंगामाला त्याचे उत्पन्न घेतले जाते. सध्या आंबा चोरीमुळे आंबा बागायतदार हैराण झाले आहेत. मोठ्या कष्टाने वाढविलेली फळे रातोरात चोरीला जात आहे असून रात्रीच्या वेळी सुरु असलेल्या खरेदी विक्री केंद्रामधून यातील बहुतांशी माल विकला जातं असल्याचे बागायतदारांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांना कोंकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेते सहकारी संस्थेच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले आहे. यात म्हटल्याप्रमाणे, रत्नागिरी जिल्हात रात्री चालणा-या आंबा खरेदी केंद्रावर बंदी घालून हापूस आंबा चोरीवर रोख लावावी. सध्या हापूस आंबा मोसम पूर्णपणे चालू झाला असून ज्यांच्या छोट्या मोठ्या बागा आहेत अशा बागांमधून संध्याकाळ ते मध्यरात्री या वेळेमध्ये आंबा चोरीचे प्रमाण अधिक प्रमाणात वाढले आहे. कारण या चोरी करणा-या माणसाला रात्रीची जी आंबा खरेदी केंद्र जागोजागी बारा / एक वाजेपर्यंत उघडी असतात त्यांचा विक्रीसाठी जास्त आधार असतो. या केंद्राच्या माध्यमातून चोरीच्या आंब्यांची सर्व विल्हेवाट परस्पर लावली जाते.

याबाबत तलाठी , सर्कल आणि पोलीस यांचे मार्फत याची माहिती करून घेतलीत तर सर्व चोरांच्या साखळीची पूर्ण कल्पना समोर येईल. या सर्व हापूस चोरीला आळा बसू शकेल असेही या निवेदनात म्हटले आहे. यावेळी आंबा बागायतदार, व्यवसायिकानी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. यावेळी प्रकाश बावा साळवी, मुकुंद जोशी, मंगेश साळवी व अन्य आंबा व्यावसायिक उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular